top of page

मुंबई आंदोलनासाठी परवानगी नाकारली; जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, उपचार, पाणी सोडले

2 hours ago
2 min read

अंतरवाली : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय आणि सामजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. अंतरावाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, मनोज जरांगेच्या 19 स्पटेंबरच्या आंदोलनालाही मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यावरून मनोज जरांगे पाटलांनी संताप व्यक्त करत मुंबई आंदोलनावर ठाम भूमिका घेतली आहे.


मागील आंदोलनामध्ये नियमांचा भंग झाल्याचे कारण देत मुंबई पोलिसांनी जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम 2025 चा नियम भंग करणार असल्याची खात्री असल्याचे सांगत मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटलांना आंदोलनासाठी परवानगी नाकारली. मनोज जरांगे पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाही असा निर्णय उच्च न्यायालयानं दिला होता. त्यामुळे सरकार न्यायदेवतेचा अपमान करत आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“ आंदोलन करण्याआधिच आम्ही नियमभंग करणार आहोत, असं त्यांना का वाटत आहे? कोणत्या कायद्याने राज्य चालवत आहात? कशाला असते राज्यकर्ता . ही काय अस्थिरता आहे. स्थिर सरकार ठेवायचं आहे की नाही?” असे विविध संतप्त प्रश्न आज मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केले.


जरांगे पाटील पुढे म्हणाले, “ म्हणे मिरवणुका काढता येणार नाहीत. गणेश उत्सवाच्य मिरवणुका निघणार नाहीत का? कोणतं हिंदुत्व? मी 19 ला मुंबईला जाणाराच. पोलिसांच्या परवानगीबाबत वकील बांधव ठरवतील.”

19 सप्टेंबरला आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करायचं ठरवलं आहे, ते होणाराच. न्यायदेवतेचे नियम आम्ही पाळणारच. न्यायदेवता म्हणतेय की कोणालाही आम्हाला रोखता येणार नाही, पण हे आम्हाला रोखत आहेत. म्हणजे मी सांगितलेलं षडयंत्र ते हेच ना. राज्य अस्थिर कोण करत आहेत?” असं मनोज जरांगे म्हणाले.


15 सप्टेंबरला आम्ही इथून निघणार आणि मुंबईत जाऊन शांततेत उपोषण आणि आंदोलन करणार. त्यांना परवानगी द्यायची की नाही ते त्यांनी ठरवायचं. 19 ला आझाद मैदान लोकशाही मार्गाने शांततेत बेमुदत उपोषण होणार. आजपासून सलाईन- पाणी सर्व सोडलं. आता डॉक्टरांना सांगितलं होतं की सलाईन लावायला ,पण आता सलाईन, पाणी, उपचार सर्व बंद करत असल्याचंही जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Comments


bottom of page