top of page

आझाद मैदानामध्ये आदोलनासाठी जरांगे पाटीलांना मुंबई पोलिसांनी दुसर्‍यांदा परवानगी नाकारली

1 day ago
2 min read

मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी पुन एकदा परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे यांचं जालन्यातील अंतरवली सराटी येथे गेल्या 16 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आपल्या मागण्या मान्य न झालयाने आता जरांगे मुंबईच्या दिशेला कूच करण्याच्या तयारीत आहेत. मनोज जरांगे उद्या सकाळी अंतरवलीहून मुंबईच्या दिशेने मार्गक्रम करणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदान उपोशण करण्याचा त्यांचा मानस आहे. पण मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणालाव पुन्हा एकदा परवानगी नाकारली आहे. मुंबईतील सध्याचा गणेशोत्सव आणि मनोज जरांगे यांचे याआधीची जाहीर वक्तव्य यांचा दाखला देत पोलिस मनोज जरांगे यांना उपोषण करण्यास परवानगी नाकारली आहे.


“ आपण आमरण उपोषणादरम्यान प्रसारामध्यमांशी संवाद साधताना आंदोलकांना लाखो करोडोंच्या संख्येने मुंबईत येण्याचे आवाहन केलेले आहे. 45 लाख वाहने मुंबईत आणणार , गनिमी काव्याने मुुंबईत या, तसेच परवानगी नकारली तरी मुंबईत जणारच, अशा आशयाची जाहीर वक्तव्य केल्याचे निदर्शनास आले आहे.’


‘त्यामुळे संदर्भ क्र.5 मध्ये नमूद केलेल्या आंदोलकांची संख्या आणि आपण यापूर्वी सादर केलेल्या आर्जातील माहिती तसेच आपण केलेली सार्वजनिक आवाहने आणि वक्तव्य याचा एकत्रीत विचार करता, प्रस्तावित आंदोलनास उपस्थित राहणार्‍या आर्जामध्ये नमुद केलेल्या संंख्येपेक्षा लक्षणीयरित्या अधिक असण्याची शक्यताव दिसून येते.’


“ आपण सादर केलेल्या पहिल्या आर्जामध्ये नमुद केल्याप्रमाणे आपली आमरण उपोषण करण्याची मानसिकता दिसून येत आहे. आपल्या संदर्भ क्रमांक 05 मधील अर्जाचा विचार करता, आपल्या पुनश्च अर्जामधील प्रपत्र ‘ ब’ मध्ये 18/09/2026 पासून आमरण उपोषण, धरणे व आंदोलन असे नमूद केले आहे.”


“ त्यामुळे पूर्वी परवानगी नाकारताना विचारात घेतलेल्या वस्तुस्थिती मध्ये बदल झालेला नाही. त्यामुळे माझी खात्री झाली आहे की, आपल्या आंदोलनाची दिशा स्वरूप या पूर्वी सादर केलेल्या आर्जाप्रमाणे राहणार आहे. आपल्या आंदोलनामुळे संदर्भ क्र. 4 मध्ये विस्तुतपणे विवेचन केल्याप्रमाणे मुंबईतील सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक सुव्यवस्था, सार्वजनिक सुरक्षितता बाधित होणार आहे.”


“ त्याअर्थी सर्वोच्च न्यायालयाचे “ अमित सहाणी केस” मध्ये दिलेले निर्देश व मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेले निर्देश, तसेच “ जाहिर सभा,आंदोलने व मिरवणुका नियम 2025 मधील नियमावली यांचे नियम क्रमांक 4(3)(च), 5,6,7,10,11 (ड), 11 (ज), 11(झ),11(8) यांचा भंग आपल्याकडून जाणीवपूर्वक करण्यात येईल. याबाबत माझी खात्री पटलेली आहे. तसेच दक्षिण मुंबई परिसरातील सामान्य व्यवहार, जसे शाळा, रुग्णालय, व्यवसाय, न्यायपालिका, सार्वजनिक वाहतुक व सार्वजनिक आरोग्य बाधित होवून सार्वजनीक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने, मी याद्वारे आपण आझाद मैदान येथे संदर्भ क्र.5 अन्वये दिनांक 18/09/2026 रोजी पासून आमरण व धरणे आंदोलन यासाठी मागितलेली परवानगी नाकारण्यात येत आहे.”


“ तथापी संदर्भ क्र. 4 व उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे परवानगी नाकारण्याबाबत विस्तृत विवेचन केले आहे ज्यामध्ये प्रामुख्याने आझाद मैदान येथे आंदोलन करताना होणार्‍या नियम भंगाबाबत नमुद केले आहे. तसेच 14/09/2026 ते 26/09/2026 या काळात मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. गणेश उत्सवादरम्यान भाविकांची होणारी अलोट गर्दीमुळे मुंबई ही कायम राष्ट्रविघातक शक्तींच्या निशाण्यावर राहीलेली आहे.”


“ सदरील काळात सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. याद्वारे आपल्याला सुचित करण्यात येते की, आपण गणेश उत्सवानंतर आझाद मैदान सोडून इतर ठिकाणाबाबत पुनश्च: अर्जाद्वारे मागणी केल्यास सांगोपांग विचार करून त्यावेळच्या परिस्थितीनुसार संबंधीत सक्षम प्राधिकार्‍याद्वारे निर्णय घेण्यात यईल.” असं आझाद मैदान पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी नमुद केले.

Comments


bottom of page