आमदार धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीमंडळात संधी?
- Navnath Yewale
- Jul 25
- 1 min read
उपमुख्यमंत्री आजित पवारांनी स्पष्टोक्ती

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्तेतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. तसी कबुली स्वत: धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर दिली. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यातच अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री पदाचा दूरपयोग करत कृषी विभागाचे टेंडर चुकीच्या पद्धतीने काढल्याचा आरोपही केला. मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कृषीच्या टेंडर प्रकणात क्लिन चिट दिली आहे. या उलट याचिकाकर्त्यांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. यावर अजित पवार यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली आहे.
धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री असताना हँड पंप, किटक नाशकं खरेदीच्या टेंडमध्ये अफरातफर केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, याचिका कर्त्यांने धनंजय मुंडे यांनी कृषी विभागामार्फत शेतकर्यांसाठी हातपंप,किटक नाशकं खरेदी प्रकरणात अफरातफर केल्याचा दावा केला होता. मां. उच्च न्यायालयाने गुरूवारी (24 जूलै) रोजी धनंजय मुंडे यांना क्लिन चिट देत खरेदी टेंडर नियमानुसार झाल्याचा निकाल देत याचिका कर्त्यास एक लाखाचा दंड ठोठावला.
आमदार धनंजय मुंडे यांना मा. उच्च न्यायालयाने क्लिन चिट दिल्याने. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना भुमिका स्पष्टकरत धनंजय मुंडे यांच्या आणखी काही प्रकरणाची मा. न्यायालयात प्रकरणं सुरू आहेत. काहींची चौकशी सुरू आहे. त्यासर्व प्रकरणात जर अशीच स्थिती समोर आली तर आम्ही धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करणार असल्याचे सांगितले



Comments