top of page

जनरल नरवणे यांचे पुस्तक दाखवत राहुल गांधी यांचा मोदींवर घणाघात ! पंपतप्रधानांकडे सभागृहात येण्याचे धाडस नाही- राहुल गांधी

नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेच्या आवारात माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी दावा केला की, जेव्हा चीन रणगाडे भारतीय सीमेवर (कैलास रिज) पोहोचले, तेव्हा पंतप्रधान आणि संपूर्ण सरकारने लष्कराला त्यांच्याच मर्जीनुसार सोडून दिले.


संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांचे पुस्तक हातात दाखवत म्हटले की, “ पंतप्रधानांकडे आज लोकसभेत येण्याचे धाडस आहे, असे मला वाटत नाही. जर त्यांनी तसे केले तर मी त्यांना हे पुस्तक स्वत: देईन जेणेकरून ते वाचू शकतील आणि देशाला सत्य कळू शकेल.” देशातील प्रत्येक तरुणाला या पुस्तकात काय लिहिले आहे, हे माहित असले पाहिजे असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.


दरम्यान, राहुल गांधींनी माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला देत एका घटनेची आठवण सांगितली. ते म्हणाले की, “ जेव्हा चिनी रणगाडे कैलास पर्वतावर पोहोचले, तेव्हा जनरल नरवणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना फोन केला आणि त्यांनी काय करावे असे विचारले. पण राजनाथ सिंह यांनी प्रतिसाद दिला नाही. जनरल यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनाही संपर्क साधला, परंतु तेथूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही”


माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, “ जेव्हा जनरल यांनी राजनाथ सिंह यांना पुन्हा फोन केला तेव्हा त्यांनी “ वरच्या” (पंतप्रधान) यांच्याशी संपर्क साधून त्यांना कळवण्याचे आदेश दिले होते. “ वरच्या ” अधिकार्‍यांकडून अदेश होता की, जर चिनी सैन्य घुसले तर त्यांनी परवानगीशिवाय त्यांच्यावर गोळीबार करू नये, शिवाय आमचे सैन्य त्यांच्यावर गोळीबार करू इच्छित होते कारण ते आच्या हद्दीत होते”


नरेंद्र मोदींनी तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा ’ असा संदेश पाठवला. याचा सरळ अर्थ असा आहे की पंतप्रधानांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही. त्यांनी लष्करप्रमुखांनाजे काही कराचे ते करण्यास सांगितले कारण ते त्यांच्या नियंत्रणाबाहेर होते. पुस्तकात , नरवणे जी यांनी लिहिले आहे की, त्यावेळी मला पूर्णपणे एकटे वाटले, जणू संपूर्ण आस्थापना (सरकार) मला सोडून गेली होती.

Comments


bottom of page