मराठा तरुणींबद्दल नवनाथ वाघामरेंचे संतापजनक वक्तव्य समाजाकडून संताप; सोशल मीडियावर संताप्त भावना, माफीची मागणी
- Navnath Yewale
- 11 hours ago
- 1 min read

बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक झाले आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. कुणबी प्रमापत्र रद्द प्रकरणी जरांगे पाटील यांनी मंत्री बावनकुळे यांच्यावर घणाघाती टीका केली. मनोज जरांगे विरुद्ध बावनकुळे संघर्षाम ुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं असतानाच आता नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणारे ओबीसी नेेते नवनाथ वाघमारे यांनी आज मराठा तरुणींबाबत संतापजनक वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मराठा समाजाविषयी नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणारे नवनाथ वाघमारे यांनी आज माध्यमांसमोर मराठा तरुणींविषयी संतापजनक वादग्रस्त वक्तव्य केले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत नवनाथ वाघमारे म्हणाले की, “काल मंत्री बावनकुळेंनी सांगितलं म्हणाले माझी सुन मराठा आहे, पत्नी कुणबी आहे. त्यांच्या घरात सगेसोयरे घुसले असतील. बावनकुळे यांच्या एकट्याच्याच नाही तर अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजेच ओबीसींच्या मंत्र्यांचे गोंडस, सुंदर मुलं अन् पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसल्या. मराठ्यांच्या मुलींच ऐकून मंत्री ओबीसींचं वाटोळं करत असतील तर, त्यांनी समोर येऊन सांगावं आम्हाला ओबीसीचं घेणं-देणं नाही.” असं संतापजनक, वादग्रस्त वक्तव्य केल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. नवनाथ वाघमारे यांनी थेट मराठा समाजाच्या तरुणींबद्दल केलेलं संतापजनक वक्तव्यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात तिव्र भावना व्यक्त होत असून माफीची मागणी केली जात आहे.



Comments