top of page

अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला मोठं यश; रात्री उशीरा हायकोर्टाकडून नोटीस

छत्रपती संभाजीनगर: हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेवरून विद्यार्थ्यांनी राज्यात अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाता सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके विद्यार्थ्यांना पाठींबा देत छत्रपती संभाजीनगरच्या आंदोलनात सभागी झाले. ऑनलाईन लिपिक परीक्षेत मोठ्या त्रुटी उघडकीस आल्या होत्या. अनेक सेंटरवर सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण निर्माण झाली. तर काही सेेंटरवर पुरवलेले संगणकीय किबोर्ड नादुरुस्त होते. त्यामुळे विद्यार्थी दहा मिनिटात लॉग आऊट होत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपात्र केल्याने चिडलेल्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला अभिजीत दिपके यांनी पाठिंबा देत, जिल्हा न्यावयाधीशांची भेट झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच निर्णय घेतला. तर कल्याण येथे सत्र न्यायाधीशांची कार विद्यार्थ्यांनी आडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रात्री उशीरा या प्रकरणात हायकोर्टाने दखल घेत नोटीस जारी केली आहे.


हायकोर्ट क्लार्क लिपिक ऑनलाईन परीक्षेसाठी यंदा राज्यभरात सेंटर जारी करण्यात आली होती. कल्याण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षे दरम्यान अनेक तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना जावे लागले. अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन होते. तर पुरवण्यात आलेले संगणकाचे किबोर्ड देखील नादुरुस्त होते. त्यातच अवघ्या दहा मिनिटांत विद्यार्थ्यांना अपात्र ठरवून लॉग आऊट करण्यात आले. त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातून या परीक्षेला बसण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयीचा समाना करावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कल्याण, छत्रपती संभाजीनगरमध्ये निदर्शने आणि ठिय्या आंदोलन सुरू केले.


सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास भेट दिली. त्यांच्या समस्या जाणून घेत स्वत: आंदोलनात सहभागी झाले. या प्रकरणात जिल्हा न्यायाधीशांची भेट घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, न्याय मिळेपर्यंत मागे हटणार सल्याचा निर्धार त्यांनी घेतला. त्यानंतर सायंकाळी उशीरा विद्यार्थ्यांच्या शिष्ठमंडळाला परीक्षा केंद्रात भेटीसाठी बोलावण्यात आले. शिष्ठमंडळाच्या चर्चेनंतर रात्री उशीरा हायकोर्टाने या संदर्भात नोटीस काढली आहे. विद्यार्थ्यांची बाजू ऐकून या प्रकरणाची आता चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.


कल्याणमध्ये न्यायसाधीशांची गाडी आडवली: कल्यान एपीएमपी मार्केटमधील ‘ हायकोर्ट क्लार्क टायपिंग स्किल टेस्ट’ दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले. संतप्त विद्यार्थ्यांनी कल्याण सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश परविन सय्यद यांच्या गाडीला घेराव घालत तब्बल दीड तासांहून अधिक काळ त्यांना रोखून धरले, “ टेक्निकल इश्यू असेलेल्या केंद्रांची परीक्षा पुन्हा घेऊ” असे अश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. तरीही परीक्षा केंद्राकडून लेखी अश्वासन देण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम होते. काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक संकेश भोईर आंदोलनात सहभागी झाल्याने आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळाले आहे. न्यायाधीश स्वत: कारमध्ये बसून राहिले आणि या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

Comments


bottom of page