top of page

सरकारने चुक दुरुस्त करावी.., मराठे मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत!- जरांगे पाटील, आंतरवाली सराटीत अभ्यासकांची बैठक; राज्यात पुन्हा भगवं वादळ

Aug 16
2 min read

आंतरवाली (सराटी): कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यावर जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर (दि.29 ऑगस्ट)आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर रविवार (दि.16) आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण अभ्यासकांची बैठक बोलावली होती. सरकारने चुक सुधारावी अन्यथा मराठे वर्षा बंगल्यावर आंदोलनासाठी मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत असल्याचा गर्भीत इशारा त्यांनी यावेळी दिली. बैठकीसाठी राज्यभरातून मराठा आरक्षण अभ्यासकांनी उपस्थिती लावली.


मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे आज मराठा अभ्यासकांची बैठक संपन्न झाली. बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरकारने केलेली चूक तत्काळ दुरूस्त करण्याचा इशारा दिला. सरकारने रद्द केलेली प्रमाणपत्रं पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी केली. शिवाय सरकारने चूक दुरुस्त केली तर आपले संबंध पूर्वीप्रमाणेच चांगले राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


अंतरवली सराटी येथे झालेल्या बैठकीत मराठा अभ्यासकांकडून राज्यातील तळागळातील आरक्षणांसदर्भातील परिस्थितीची माहिती जरांगे पाटील यांनी जाणून घेतली. विविध ठिकाणी निर्माण झालेल्या हरकती, प्रमाणपत्रांचे प्रश्न आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीतील अडचणी याबाबतही त्यांनी मराठा अभ्यासकांकडून माहिती घेतली. योवळी जरांगे पाटीलयांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही सवाल उपस्थित केले. सरकारने गॅझेटनुसार प्रमाणपत्रं दिलील आणि त्यानंतर तीच प्रमाणपत्रं रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जात असेल, तर ज्यामागचे कारण काय? तसेच ही प्रमाणपत्रं कोणाच्या इशारार्‍यावर रद्द केली जात आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये, अशी मागणी करताना जरांगे पाटील यांनी आपल्या समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्वाचा असल्याचे सांगितले. मला राजकारणाशी काही देणे- घेणे नाही. मात्र, गरीब मराठा समाजातील मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यावंनी आमदार प्रसाद लाड यांनी प्रमाणपत्रांच्या मुद्यावर बावनकुळे यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली असल्याचे सांगितले. प्रमाणपत्र सरकसट रद्द करू नयेत, असा सल्ला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही प्रमाणपत्रं रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.


मंत्री बावनकुळे यांनी मला चारवेळा फोन केला, पण मी तो उचलत नव्हतो शेवटी चुक दूरुस्त करणार असलात तर बोलतो, असं म्हटल्यावर त्यांनी चुक दुरुस्त करण्याची ग्वाही दिली तेव्हा मी बोललो. सकाळी नाही सांगितलं पण आता सांगतो, चुक दुरूस्त करण्याचे अश्वासन मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. त्यानुसार भाजप आता कामाला लागली आहे. चुक दुरूस्त करा आजपासून व्यंगावर बोलाणार नाही, पण चुक दुरूस्त झाली नाही, तर 28 ऑगस्टच्या खूप काही बोलेल असा इशाराही त्यांनी दिला.


प्रशासकीय स्तरावर कुणबी प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी येणार्‍या अडची व त्यावर पर्यायाबाब विविध अभ्यासकांनी आपली मत मतांतरे मांडली. हॅद्रबाद गॅझेटिअर च्या जीआरमध्ये दुरूस्ती बाबत जरांगे पाटील यांनी अभ्यासकांचे पर्याय मागितले. तत्पुर्वी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारवर जोरदार टिका केली. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कालावधीत मराठा समाजाच्या नोंदी मिळाल्या हे मोठं काम आहे. नोंदी शोधल्या सरकारच्याच समितीने आणि शोधलेल्या नोंदी नुसार दिलेले प्रमाणपत्र रद्द करणारही सरकारचीच यंत्रणा असा विरोधाभास मराठ्यासोबतच का? असा प्रश्न उपस्थित करत जरांगे पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे यांना फडणवीसांनी मोठं होऊ दिलं नाही.


दरम्यान, 29 ऑगस्ट रोजी होणार्‍या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर त्यांनी राज्यातील मराठा समाज बांधवांनी जयारीत राहण्याचे आवाहन केले. आपण आपली बाजू घेऊन कुठेही निघू. असे सांगत त्यांनी मुंबईकडे कूच करण्योच सूचक संकेत दिले. तसेच आपल्यालाही एसी बंगल्यांची हवा खायची आहे, असे म्हणत त्यांनी सरकारला अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी जरांगे पाटील आणि सरकार यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या भूमिकेत कोणता बदल करतात, तसेच जरांगे पाटील यांच्या मुुंबईकडे जाण्याच्या संकेतांवर प्रशासन काय तयारी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र आजच्या बैठकीनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याचे चित्र आहे.

Comments


bottom of page