विरोधीपक्षाचं लोकसभेच्या गेटवर आंदोलन; बघा गद्दार चालले, काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या मंत्र्याला राहुल गांधीनी डिवचले, शाब्दीक चकमकीचा व्हिडीओ व्हायरल
- Navnath Yewale
- 2h
- 1 min read

नवी दिल्ली: देशाचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकावरून लोकसभेत दोन दिवसांपासून जोरदार घमासाण सुरू आहे. या पुस्तकाचे अद्याप प्रकाशन झालेले नाही, त्याआधीच मोठा गदारोळ सुरू झाला आहे. यामुळे अनेकवेळा संसदेचे कामकाज अनेकवेळा तहकुबही करण्यात आले. याचमुद्यावरुन संसद परिसरात विरोधकांचे आंदोलन सुरू आहे.
आज आंदोलनावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय राज्य मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात बाचाबाचीचा प्रकार समोर आला आहे. या बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मंत्री बिट्टू यांना गद्दार म्हणाले तर बिट्टू राहुल गांधींना देशाचा शत्रू म्हणत पलटवार केला. विशेषम्हणजे मंत्री बिट्टू हे मुळचे काँग्रेसचेच.
लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी यांच्यासह इतर खासदार संसदेच्या पायर्यांवर आंदोलन करत होते.
तेव्हा बिट्टू यांच्याकडे बघत राहुल गांधी म्हणाले की, एक गद्दार चालत येत आहे. त्यांचा चेहरा बघा. यावर एकच हशा पिकला. गद्दार म्हटल्यानंतर राहुल गांधी यांनी बिट्टू यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. ‘ हॅलो ब्रदर, मेरे गद्दार दोस्त चिंता मत करो तुम कुछ दिन बाद यहाँ पवे वापस आओगे’ असे म्हणत मंत्री बिट्टू यांच्याकडे हस्तादोंनाचा प्रयत्न केला, मात्र मंत्री बिट्टू यांनी राहुल गांधीशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. यावेळी दोघांमध्ये चाब्दीक चकमक झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, मंत्री रवनीत बिट्टू यांची राजकीय कारकीर्द राहुल गांधी यांच्यामुळेच सुरू झाली. बिट्टू हे तीनवेळा काँग्रेसचे खासदार राहिले आहेत. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीत पराभव होऊनही भाजपकडून त्यांना मंत्रिपद देण्यात आले.



Comments