रस्त्यांच्या दुरावस्थेवरून मंत्री गुलाबराव पाटलांची स्थानिक आमदारावर सडकून टीका या रस्त्याने पुन्हा त्यास गावात येऊ देवू नका.. माझ्याकडे असा रस्ता असता तर मी मारले असते
- Navnath Yewale
- 24 minutes ago
- 2 min read

लातूर : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता खराब रस्त्यावरुन त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. लातूर जिल्ह्यातील कामखेडा येथे प्रचारासाठी येताना रेणापूर ते कामखेडा या रस्त्याच्या दुरावस्थेवरुन स्थानिक आमदारावर त्यांनी जोरदार टीका केली. सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेल्यांना या निवडणुेकीतुन फक्त पैसे कमवायचे असतात. म्हणून ते कुणीकडूनही तिकीट घेतात आणि पैसे वाटून निवडून येतात, अशा शब्दात पाटील यांनी आमदारावर टीका केली.
लातूरमधील भाजपा आणि काँग्रेसचे उमेदवार हे दोघेही दांडगे आहेत, त्यांना फक्त पैसे कमवायचे आणि वाटायचे आहेत. त्यामुळे दोघे पण एकमेकांना आय लव यू म्हणतात, से गुलाबराव पाटील यांनी म्हटले. तसेच काँग्रेसवाल्यांचा सत्यानाश होऊ द्या , जर मी उद्या मंत्री नसलो आणि माझ्याकडे असा रस्ता असेल तर मी खुुटा उपटून मारेन, असे म्हणत खराब रस्त्यावरुन पाटील चांगलेच संतापले. कामखेडा ते रेनापूर रस्त्याची झालेली दुरावस्था पाहून मंत्री पाटील चांगलेच संतापले होते. या रस्त्याने या भागाच्या आमदाराला गावात पुन्हा येऊ देऊ नका, रस्ता दुरुस्त करा आणि मगच गावात या..असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला. या रस्त्याने प्रवास करताना प्रत्येकाला त्रास होत आहे. जर मी उद्या मंत्री राहीलो नाही आणि माझ्याकडे असा जर रस्ता असेल तर मी संबंधितांना मारेल, मग माझ्यावर केस झाली तरी परवा नाही, अशा शब्दात संताप त्यांनी व्यक्त केला.
भाजपवर हल्लाबोल: शिवसेना पक्षात कार्यकर्ते तयार होतात आणि तयार झालेले कार्यकर्ते भाजपा, काँग्रेस यांसारख्या पक्षात घेतले जातात. त्यामुळे आम्ही मुलं जन्माला घालायचे आणि मुले गुबगुबीत झाली की भाजपाने मांडीवर बसून घ्यायचे असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाना साधला.
मंत्री गुलाबराव पाटील यांचे हवाई उड्डाण रद्द: मंत्री गुलाबराव पाटील लातूर दौर्यावर असताना त्याचे परतीचे हवाई उड्डाण रद्द करण्यात आले. हवाई यंतणांकडून क्लिअरन्स न मिळाल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांचे लातूर येथून होणारे हवाई उड्डाण रद्द करण्यात आले आहे. एव्हिएशन कंपनीचे सहा आसन क्षमतेचे विमान लातूर विमानतळावरून साडेचारच्या सुमारास उड्डाण करणार होते. त्यासाठी हैदराबाद, बिदर आणि चेन्नई येथून अवश्यक क्लिअरन्स मिळण्याची प्रतीक्षा पाच वाजेपर्यंत करण्यात आली. मात्र, ठराविक वेळेत क्लिअरन्स न आल्याने पायलटने उड्डाणास असमर्थता दर्शवली. तसेच संध्याकाळी लातूर येथून विमान उड्डाणस मर्यादा अखेर आजचे हवाई उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. लातूर विमानतळावर संध्याकाळी उड्डाण होईल अशी यंत्रणा नाही, त्यामुळे गुलाबराव पाईल यांना रस्तेमार्गाने कारने प्रवास करावा लागला.



Comments