top of page

पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्र्यानी पदर खोचून कोर्टात केला युक्तीवाद मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी इतिहास घडवला : सरन्यायाधिशासमोरच निवडणूक आयोगाला दाखवला हिसका !

नवी दिल्ली : बिहारनंतर आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी देशाचे राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. भाजपकडून या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर मुख्यमंत्रीपदासह राजकारणाचा तगडा अनुभव असलेल्या ममता बॅनर्जी सहजासहजी हार मानणार्‍या नसून भाजपचं आव्हान मोडीत काढण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो. पण आता याच ममता बॅनर्जींनी इतिहास घडवला आहे.


मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (एसआयआर) प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वत:च सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी युक्तीवाद केला. देशाच्या इतिहासातध्ये सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करणार्‍या पहिल्या विद्यमान मुख्यमंत्री त्या ठरल्या आहेत.

ममता बॅनर्जी या एक निष्णात वकील आहेत. आता त्यांनी निवडणूक आयोगालाच कोर्टात खेचत एसआयआर प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभेची 2026 ची निवडणुक सुधारित यादीऐवजी सध्याच्या 2025 च्या मतदार यादीनुसारच घेण्यात यावी याबाबतची जोरदार आग्रही मागणी केली आहे.


दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी या याचिकेद्वारे निवडणूक अयोगाला 24 जून 2025 आणि 27 ऑक्टोबर 2025 रोजी एसआयआर संबंधित दिलेले सर्व आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर पश्चिम बंगालचं राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पण ममतादीदी आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बुधवारी (दि.4) सर्वोच्च न्यायालयात झालेल्या युक्तिवादात त्यांच्या वकिलांसह यात सहभागी झाल्या. ही सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठासमोर पार पडली. ममता बॅनर्जी यांचे वकील ज्येष्ठ अधिवक्ता श्याम दिवाण आहेत.


पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जीचा निवडणूक अयोगाविरोधातील हा कायदेशीर लढा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या बिहारमध्येही अशाच प्रकारे राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेला आव्हान देणार्‍या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. यावेळी ममता बॅनर्जी यांनी न्यायालयात मतदारयादी पडताळणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर खर्‍या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवलूे जाण्याचा धोका बोलून दाखवला.


युक्तिवाद करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, नावांच्या चुकीबद्दल जे काही आहे ते मी समजावून सांगू शकते, मी त्याच राज्यातून आहे. समस्या अशी आहे, की जेव्हा सर्व काही संपते ,जेव्हा आम्हाला न्याय मिळत नाही. ममता म्हणाल्या की, जेव्हा न्याय दारामागे रडत होता, तेव्हा आम्हाला वाटले की आम्हाला कुठेही न्याय मिळत नाहीये.


पुढे त्या म्हणाल्या की, मी एका सामान्य कुटुंबातून आलेली आहे. पण मी माझ्या पक्षासाठी लढत नाहीये. जेव्हा वकील सुरुवातीपासूनच लढत असतात, पुढे वारंवार रेकॉर्डवर ठेवले जातात. निवडणूक आयोगाला सहा पत्रे लिहिली गेली आहेत आणि एकही उत्तर मिळालेले नाही, मागच्या दाराने कुठेतरी न्याय अडकला आहे असे वाटणे स्वाभाविक आहे असंही बॅनर्जी म्हणाल्या.

तसेच यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायलयात आपली बाजू मांडताना केला पाच मिनिटे द्या, अशी मागणी केली. त्यावर सीजेआय यांनी आम्हाला कोणतीही अडचण नाही. आम्ही तुम्हाला 15 मिनिटे देऊ. प्रत्येक समस्येचे निराकरण असते. आम्ही या समस्येवर देखील उपाय शोधू. तुमचे राज्य सरकार देखील येथे आहे. तुमचा पक्ष देखील येथे आहे. तुमच्याकडे देशातील सर्वात ज्येष्ठ वकील उपस्थित आहेत. तुम्ही उपस्थित केलेल्या चिंता आम्ही मान्य केल्या आहेत. त्या रेकॉर्डवर आहेत. पण प्रत्येक समस्येचे निराकरण असत, असंही दीदी यांनी सांगितलं.


ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला बोलू द्या. मला काही फोटो शेअर करायचे आहेत. सर्व बंगाली वर्तमानपत्रांनी ते प्रकाशित केले आहेत. सुप्रीम कोर्टात आम्हाला समस्येवर तोडगा हवा आहे.यावर आम्ही सहमत आहोत. भाषेतील अडथळे किंवा नावांच्या जुळणार्‍या स्पेलिंगमुळे मतदार यादीतून कोणालाही वगळावे, असे आम्हालाही वाअत नाही, असं महत्वाचं निरिक्षणही कोर्टानं यावेळी नमूद केलं.


निवडणूक अयोगाच्या वकिलांनी ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. सीजेआय म्हणाल्या , मॅडम ममता, तुमचा शाम दिवाण या वकिलाच्या क्षमतेबद्दल शंका नाही. तुम्ही खूप चांगला वकिल निवडला आहे. त्यांना युक्तिवाद करु द्या. आम्ही सोमवारी खटल्याची सुनावणी करू. अम्हाला विश्वास आहे की आम्ही एक प्रॅक्टिकल उपाय शोधत आहोत. फक्त बंगालसाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंगालला लक्ष्य केले जात आहे. ममता सुप्रीम कोर्टाला हात जोडून म्हणाल्या, “ लोकशाही वाचवा”


तसेच पश्चिम बंगालला बुलडोझर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाकडून ममतांच्या याचिकेवर नोटीस जारी करण्यात आली आहे. सोमवारी पुन्हा होणार सुनावणी होणार आहे. ममता बॅनर्जी यांनी एसआयआर च्या विरोधात 26 कवितांचे पुस्तक लिहित आंदोलनाचा नवा पायंडा पाडला आहे. त्या म्हणाल्या की. त्यांच्या नावावर आतापर्यंत 163 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ममता बॅनर्जी यांनी असेही सांगितले की, त्या ना माजी खासदार म्हणून पेन्शन घेतात ना मुख्यमंत्री म्हणून वेतन, तर पुस्तके आणि इतर रचनात्मक कामांतून मिळणार्‍या रॉयल्टीतून आपले वैयक्तिक खर्च भागवतात.


दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (दि.2) दिल्लीत काळी शाल पांघरुन मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत एसआयआर प्रभावित 13 कुटुंबे आणि टीएमसी चे नेतेही होते. मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटीत त्यांनी आपले मुद्दे सीईसी यांना सांगितले, पण त्यांचे उत्तर ऐकल्याशिवायच त्या रागावून निघून गेल्या.

या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी मी खूप दु:खी आहे. मी दिल्लीच्यवा राजकारणात खूप काळापासून सक्रिय आहे. मी आजपर्यंत असा अहंकारी आणि खोटा निवडणूक आयुक्त पाहिला नाही. ते अशाप्रकारे बोलतात जणू ते जमीनदार आहेत आणि आम्ही नोकर अशी टीकाही त्यांनी यावेळी केली होती.

Comments


bottom of page