आमदार परबांच्या आरोपांचा ज्योती दामदास कदम यांच्याकडून खंडन
- Navnath Yewale
- Oct 5
- 1 min read

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिवसेना रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 1993 मध्ये रामदास कदम यांच्या पत्नीने जाळून घेतले होते की, त्यांना जाळले होते, याचीही नार्को टेस्ट केली जावी असं परब म्हणाले होते. ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला? जाळून घेतलं की जाळलं? आजही खेडमध्ये घटनेचे साक्षीदार आहेत. गरज पउली तर त्यांनाही मी समोर आणेल. खूप साक्षीदार आहेत असं अनिल परब यांनी म्हटलं होतं. यावर आता ज्याती रामदास कदम यांनी खुलासा केला आहे.
ज्योती रामदास कदम म्हणल्या की, काल त्यांनी जे आरोप केले फार चुकीचे आहेत. तेव्हा असं काही झालं नव्हतं, आम्ही करवंत्या जाळून स्वयंपाक करत होतो. स्टोव्हमुळे आधी माझा पदर जळाला, त्यानंतर ही घटना घडली. उपचारासाठी आधी जसलोकला आले, त्यानंतर मला बाहेरच्या देशात उपचारासाठी नेले. हे आरोप फार चुकीचे आहेत. बदनाम करू नका आम्हाला त्रास होत आहे.
यावर रामदास कदम म्हणाले की, अनिल परब यांच्याविरोधात माझी पत्नी कोर्टात जाणार आहे. बदनामी करण्याचे काम परबांनी केले आहे. त्यावेळी काय झाले हे अनिल परबांना माहिती आहे का? माझी नार्को टेस्टची तयारी आहे. उद्याही माझी तयारी आहे. त्यातून सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्याची ते सांगा.
माझी पत्नी दोन स्होव्हवर जेवण बनवत होती. साडीला आग लागली. अन् आगीचा भडका उडाला. मी तिला वाचवलं. माझे हात भाजले. सहा महिने अॅडमिट होती. जसलोकमध्ये. मी जसलोकमध्येच होतो. आजही आम्ही जीवाभावाने संसार करतोय. तू काय सांगतो. अशा पद्धतीने तू बदनामी केलीय ना.. त्यावर मी दावा टाकणार आहे. मी यावर कोर्टात जाणार आहे. मानहानीचा दावा टाकणार असल्याचंही रामदास कदम म्हणाले.


Comments