top of page

..आम्ही ओबीसीत नाही तर, ओबीसीच आमच्यात घुसले!

जरांगे पाटलांचा नवा दावा; आमचंच आम्हाला मिळालं



मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील उपोषणानंतर सरकारला आरक्षणाविषयी निर्णय घेण्यास भाग पाडले. राज्य सरकारने मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्याचा जीआर काढला आहे. याच पार्श्वभूमिवर जरांगे पाटील यांनी जीआरचा विरोध करणार्‍यांना टोला लगावत “आम्ही ओबीसीत गेलो नाहीत, तर ओबीसीच आमच्यात आलाय” असा दावा केला आहे.


जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाचा हक्का आता मिळाला आहे. त्यांनी सांगितले की, “ माझ्या पोरांनी करोडोंनी मुंबईत हजेरी लावली आणि विजय घेऊन आले. हा विजय आमचा आहे. जीआर म्हणजे आमच्या संघर्षाचं लिखित उत्तर आहे. मराठे हे आरक्षणासाठी आधीपासून लढत आले आहेत.


आम्ही आधीपासून आरक्षणात होतो. आता फक्त त्याची अंमलबजावणी होत आहे.” यावेळी जरांगे पाटील यांनी इतर मराठा नेत्यांवरही अप्रत्यक्ष निशाना साधला ‘ ते माझ्या विरोधात का जातात हे मला माहित नाही. मात्र, मी माझ्या समाजाचा हक्क मिळवून दिला आहे.


छगन भुजबळ यांच्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. “ भुजबळांना जीआर चांगला कळातो. त्यांनी मोठमोठे पक्ष हाताळले आहेत, सत्ता संभाळली आहे, त्यामुळे जीआरचा अभ्यास त्यांना चांगला आहे. पण सत्य हेच आहे की आम्ही ओबीसीत गेलेला नाही, उलट ओबीसी आमच्यात आलाय” असं जरांगे पाटील म्हणाले.


पाटील इतिहासाचा दाखला देत सांगितले की, “ 1881 पासून आम्ही आरक्षणात होतो. आमचे पूर्वज मोठ्या मनाचे होते. आता काळ बदलला आहे. समाज प्रगतिकडे न्यायचा असेल तर आक्षण गरजेचं आहे. ते आम्ही टप्याटप्याने मिळवलं आहे.”


दरम्यान, जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासदार संदिपान भुमरे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे अंबादास दानवे यांच्यासह मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेवून प्रकृतीची चौकशी केली.


विखे पाटील म्हणाले की, मागेच मी लक्ष्मण हाके यांना सल्ला दिला आहे. की तुम्ही इतरांच्या आक्षणामध्ये कशाला लुडबूड करताय,तुमच्या राजकीय पोळ्या का भाजून घेता तुम्ही. या आरक्षणाच्या विषयावर ज्यांच आरक्षण आहे त्यांना मिळतयं पण आणि ते मिळणारच आहे. ओबीसीचं आरक्षण कोणी काढून घेत नाही. एखाद्या विषयाबद्दल उपसमितीला, उपसमितीचं अज्ञान आहे का? हे आम्हाला कळत नाही. ज्यांना फार कळतं त्यांनी अति शहानपना करू नये असंही मंत्री विखे पाटील म्हणाले.

Comments


bottom of page