आष्टीच्या अद्वैतचंद्रवर रक्षाबंधनाचे त्रियोगदर्शन
- Navnath Yewale
- Aug 9
- 1 min read

बीड: भाजपचे आमदार सुरेश धस गेल्या दशकापासून मतदारसंघातील आदिवासी भगिनिंकडून राखी बांधून त्यांना संरक्षणाचे वचन देतात. यंदाचे रक्षाबंधनाच्या पर्वणीमध्ये जागतिक आदिवासी दिन, वीर एकलव्य जयंतीचा योग आल्याने अद्वैतचंद्र निवास्थानी रक्षाबंधन सोहळ्यात आदिवासी दिन, वीर एकलव्य जयंतीचे त्रियोगदर्शन घडून आले.

बहिण-भावाच्या पवित्र, अतुट प्रेमळ नात्याला घट्ट करणारा ‘एक धागा एक विश्वास’ असा रक्षबंधन उत्सव आमदार सुरेश धस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. मतदार संघातील आदिवासी भगिनींकडून राखी बांधून त्यांना संरक्षणाचे अभिवचन देताना साडी चोळीने त्यांची बोळवन केली जाते. हा उत्सव आमदार सुरेश धस यांचे वडिलांनी सुरू केली कित्तेक दशकांपासून धस परिवार हा उपक्रम राबवत आहे.

रक्षबंधन आणि दिवाळी सनाला अद्वैतचंद्र निवास्थानी मतदारसंघातील शेकडो आदिवासी भगिणी आमदार धस यांना राखी घेवून हजर असतात. यंदाही रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन, रक्षाबंधन आणि वीर एकलव्य जयंती असा त्रियोग जुळून आला.

आमदर धस यांनी आदिवासी भगिणींकडून राखी बांधून घेत त्यांना क्रांतीवरी बिरसा मुंडा, वीर एकलव्य यांच्या प्रतिमा भेट देत साडी चोळीने त्यांची बोळवन केली. यावेळी मतदारसंघातील शेकडो आदिवासी महिला भगिणींसाठी फराळाची सोय करण्यात आली होती. विशेष म्हणजे या रक्षबंधन सोहळ्यासाठी दरवर्षी स्वखर्चाने आदिवासी भगिनी आवर्जुन उपस्थित राहून आमदार धस यांना राखी बांधत आहेत.



Comments