...इथे मृत्यू नंतर ही नाही सुटका, सुविधांनाच भरले कापरे!
- Navnath Yewale
- Sep 17, 2025
- 1 min read
रस्त्या अभावी डोलीतून अंत्ययात्रा, ग्रामस्थांचा आक्रोश सरकार मायबाप ‘उघडा डोळे बघा निट’

जव्हार : पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जिल्ह्यातच जव्हार तालुक्यातील चाभर शेत पैकी नारणोली गावातील रस्त्याच्या अभावी मृतदेह डोलीवरून नेण्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पालघर तालुक्यातील चांभार शेतपैकी नारणोली या गावातील ही घटना असून, दुर्दैवी मृतदेह वाहतुकीसाठी गावकऱ्यांना आजही डोलीचा आधार घ्यावा लागत असल्याने ग्रामस्थांचा आक्रोश उफाळून आला आहे.
गावात जाण्यासाठी सुलभ रस्त्यांची व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना दैनंदिन जीवनातील कामकाज, शेतमाल वाहतूक, रुग्णांची वेळेत उपचारांसाठी ने-आण, आणि आता मृतदेह नेण्यासही प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तर आहेतच पण शासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र संतापही दिसून येत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा प्रशासनाला अर्ज करूनही रस्ता बांधकामाची दखल घेतली गेली नाही. शासनाच्या योजना कागदावरच अडकून राहिल्या आहेत. आज मृतदेह डोलीवरून गेला, उद्या आमच्या जिवंत व्यक्तीलाही स्ट्रेचरऐवजी डोलीवरून न्यायला लागले तर? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.
या घटनेमुळे जिल्ह्याच्या विकासाचा चेहरा उघडा पडला असून, पालकमंत्री गणेश नाईक, विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन पायाभूत सुविधा उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दहा -पंधरा घराची वस्ती, तिथे आजही मूलभूत सुविधा ओरडा. आज मृतदेह डोलीतून गेला, उद्या गरोदर मातेला अशा तोडीतून दवाखान्यात न्यायला लागले. सरकारने तात्काळ या पाडव्याला रस्त्याची सुविधा करून ग्रामस्थांच्या डोलीतून वेदना पुसाव्यात अशी जोरदार मागणी आणि केली.
ग्रामपंचायत पिपंळशेत -खरोडा सरपंच दिनेश जाधव.
गावकऱ्यांच्या डोळ्यातल्या अश्रू आणि शासनाचा दुर्लक्षा चा दरारा!बाय बाब सरकार आता तरी रस्ता द्या, अन्यथा रस्तावर उतरणार ग्रामस्थ
रवींद्र पवार -सामाजिक कार्यकर्ता.



Comments