इराणवरील हल्ल्याचा विनापरवान निषेध; माजी आमदारासह 26 जणांवर सोलापुरात गुन्हा
- Navnath Yewale
- Mar 5
- 1 min read

सोलापूर: सोलापुरात विनापरवाना आंदोलन करणे मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या चांगलेच आंगलट आले आहे. जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासह 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनापरवाना आंदोलन करून जमाबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी आमदार आडम, अनिल वासम, युसूफ हनीफ शेख, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी सर्व रा. सोलापुर यांच्यासह 26 जणांवरा सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोलापुरातील सदर बाझार पोलिस ठाण्याचे पोलिस जमादार यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले केले जात आहेत. त्या लष्करी कारवईच्या निषेधार्थ बुधवारी (दि.4) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यास माकपने पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी त्यासाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही माकपने सकाळी 11:20 ते दुपारी 3:00 यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले . या आंदोलनामध्ये काळे झेंडे दाखवत घोषणा देण्यात आल्या होत्या. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. माजी आमदार नरसय्या आडम आणि माकपचे जिल्हा सचिव युसूफ शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान या आंदोलनाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आमने-समाने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य वाद टळला होता. माकपने विनापरवाना निषेध आंदेालन करून जमाबंदी आदेशाचा भंग केल्याने पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी फौजदार साखरे तपास करीत आहेत.



Comments