top of page

ईडीच्या धाडीत निवडणुक रणनीतीची कागदपत्र जप्त- ममता बॅनर्जींना धक्का!


आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्री बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुरूवारी पहाटे सहा वाजता तृणमूल काँग्रेसची रणनीती आखणारी संस्था आयपॅक आणि तिचे संचालक प्रतीक जैन यांच्या ठिकाणांवर धाड टाकण्यात आली.

ईडीच्या धाडीनंतर ममता बॅनर्जी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि एक हिरव्या रंगाची फाइल घेऊन बाहेर पडल्या. त्यांनी पत्रकार परिषद घेेत गंभीर आरोप करत पक्षाचे निवडणुक रणनीती संदर्भातील सर्व डेटा जप्त केल्याचे सांगितले. उमेदवारांच्या याद्या, हार्ड डिस्क, मोबाईल फोन, पक्षाच्या रणनीती संदर्भातील कागदपत्रे ईडीने सोबत नेले, असे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी सांगितले. राजकीय पक्षांचा डेटा गोळा करणे हे ईडीचे काम आहे का?,असा सवाल देखील त्यांनी केला.


ममता बॅनर्जी म्हणल्या की, भाजप रडीचा डाव खेळत आहे. भाजपच्या कार्यालयावर मी छापा टाकून त्यांच्या निवडणूक तयारीची कागदपत्रं जप्त केली तर काय होईल. निवडणुकीच्या नवावर माझ्या पक्षाशी संबंधित सर्व माहिती ते जमा करत आहेत. त्यासाठी रडीचा खेळत आहेत.


ईडीच्या छाप्याची माहिती मिळताच ममता बॅनर्जी ह्या आपॅकचे संचालक प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी व कार्यालयात पोहोचल्या. केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी आयपॅकच्या कार्यालयाकडे जाणारा रस्ता बंद केला होता. मात्र, या यंत्रणांशी चर्चा न करता त्या थेट आतमध्ये गेल्या. इमारतीच्या तळघरातून त्या लिप्टने थेट 11 व्या मजल्यावर गेल्या तेथून त्यांनी फाइल्स घेत आपल्या कारमध्ये ठेवल्या.

Comments


bottom of page