ईव्हिएम हटाव, देश बचाव चा नारा देत आंदोलक राज्य निवडणूक अयोगाच्या कार्यालयात घुसले , धारशिवमधील धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठाणचे आंदोलक मरिनड्राइव्ह पोलिसाच्या ताब्यात
- Navnath Yewale
- Jan 20
- 2 min read

मुंबई: इव्हिएम विरोधात संताप व्यक्त करत धाराशिवच्या धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते आज (दि.20) मुंबई येथील राज्य निवडणूक अयोगाच्या कार्यालयात घुसले. कार्यकर्त्यांनी कार्यालयात प्रचंड घोषणाबाजी करत इव्हिएम हटावण्याची मागणी केली. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. संघटनेने केलेल्या इव्हिएम विरोधातील या आंदोलनामुळे निवडणूक आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचार्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मदानप्रक्रियेसाठी वापरण्यात येणार्या इव्हिएम यंत्राला विरोधी पक्षांकडून विरोध होत असतानाच आता सामाजिक संघटनांनीही यामध्ये उडी घेतली आहे. इव्हिएम हॅक होते की नाही, हा वाद प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असतो. धुळे-सोलापूर मार्गावर इव्हिएम विरोधात रस्त्यावर उतरुन जाळपोळ करण्यात आली. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हिएम वर बंदी घालण्याची मागणी करत राज्य निवडणुक अयोगाच्या कार्यालयात काहीजण घुसले होते. एकूणच ईव्हिएमच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच शेजारील कर्नाटक राज्यात ईव्हिएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने आगामी महापालिका निवडणुकांसाठी ईव्हिएम ऐवजी मतपत्रिकांवर निवडणुकीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुंबई महापालिके पेक्षा मोठ्या असलेल्या बंगळुरु महापालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाणार आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाने सप्टेंबर 2025 मध्ये स्थानिक निवडणुकांसाठी मतपत्रिका वापरण्याची शिफारस राज्य निवडणुक अयोगाला केली होती. सर्व संबंधितांशी सल्लामसल केल्यानंतर अखेर इव्हिएम ला आऊट करुन मतपत्रिकेला इन करण्यात आलं आहे. कर्नाटकचे राज्य निवडणुक आयुक्त जी.एस. संगरे यांनी स्वत: यासंदर्भात घोषणा केली आहे. त्यामुळे 25 मे नंतर बंगळुरु प्राधिकरणाअंतर्गत येणार्या 5 नगरपरिषदांच्या निवडणुका या मतपत्रिकांद्वारे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या उत्सवात राजकीय पक्षांच्या मताला किंमत देत. निवडणुक आयोगानं घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. आता मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाणार्या निवडणुकांची पारदर्शीपणे आंमलबजाणी होणं ही तेवढच महत्वाचं आहे.
दरम्यान कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत असून आता शेजारील कर्नाटक राज्या प्रमाणे महाराष्ट्रातही ईव्हिएम हटावचा जोर वाढत आहे. आज सोलापूर-धुळे मार्गावर आंदोलकांनी प्रचंड जाळपोळ करत ईव्हिएम हटावण्याची मागणी केली. संतप्त आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करत सोलापूर-धुळे महामार्ग आडवून धरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलनकांनी थेट राज्या निवडणूक आयोगाचे कार्यालय गाठून ईव्हिएम विरेाधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी कार्यालयाबाहेर ठिय्या देत सरकार, ईव्हिएम विरोधात घोषणा दिल्या. ईव्हिएम हटावा देश बचाव चा नारा देत आंदोलकांनी मागण्यांकडे लक्ष वेधले.
धाराशिवच्या छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी थेट मुंबई गाठत राज्य निवडणुक आयोगाच्या कार्यालयात घुसून राडा केला. ‘ईव्हिएम हटाव देश बचाव’ नारा देत कार्यकर्ते राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घुसले अचानक घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे अधिकारी कर्मचार्यांत चांगलाच गोंधळ उडाला. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी सर्व आंदोलकांना तब्यात घेतले आहे.



Comments