स्वयंघोषीत कॅप्टन, भोंदूबाबा अशोक खरताची सासू पार्वती शिंदे माध्यमांसमोरतो तिकाडे काय करायचा..?
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 1 min read

नाशिकमधील स्वयंघोषीत कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी आज पुन्हा नाशिक सत्र न्यायलयात हजर करण्यात येणार आहे. महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा अरोप अशोक खरातवर आहे. त्यामुळे पोलीस पुन्हा आज अशोक खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. त्याआधी अशोक खरातची सासू आणि कल्पना खरातची आई पाव शिंदे यांनी मीडियाशी बोलताना खरात बाबत महत्वाची माहिती दिली आहे.
मी एक महिन्यापासून इथे आली आहे. काय चौकशी होते आम्हाला काही माहिती नाही. कल्पना कुठे आहे मला माहिती नाही. तिच्याशी फोनवचर बोलणे झाले नाही. हे कधी थांबेल सांगता येत नाही, असं पार्वती शिंदे म्हणाल्या. तसेच अशोक खरात काय करायचा माहिती नाही. अधिकारी कुटुंबीयांसोबत चौेकशी करत आहेत, मला माहिती नाही. माझी चौकशी झाली नाही. मला काहीच माहिती नाही. मी शिक्षित नाही , मला नीट बोलताही येत नाही, असंही पार्वती शिंदे यावेळी म्हणाल्या. तसेच अशोक खरातने केलेल्या कारनाम्यावर विचारले असता, तो जात होता, त्याच्या ऑफिसमध्ये तिकडे जाऊन काय करायचा माहिती नाही. मला आणि कल्पनाला काहीच माहिती नव्हती, असं पार्वती शिंदेंनी सांगितलं. तसेच अशोक खरातला शिक्षा व्हायला हवी की नाही, या प्रश्नावर पार्वती शिंदे म्हणाल्या की शिक्षा नाही व्हायला हवी पण त्याला आता कोण सोडवणार...
कल्पना खरात अद्यापही फरार : शिर्डी पोलिस ठाण्यात अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून ती नाशिकच्या घरून फरार आहे. 15 दिवस होऊनही तपास यंत्रणेला तिला शोधण्यात अपयश आले आहे. आता पोलिसांनी तपासाची चक्र फिरवले असून कल्पनाच्या माहेरी तसेच माहेरच्या तिच्या नातेवाईकांकडे चौकशी केल्याची माहिती आहे. कल्पना खरातच्या नाशिकमधील काही मैत्रिणी, तसेच तिच्या घरी सध्या काम करणार्या अन् यापूर्वी काम केलेल्या काही नोकरांकडेही कल्पनाची चौकशी करण्यात आली पथकाला काही ठोस पुरावे मिळत नसल्याने फरार कल्पनाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.



Comments