उखाणा घ्यायला सांगितल्यासारखं काय नकार देताय - रोहिणी खडसेंनी चाकणकरांना सुनावलं
- Navnath Yewale
- Jul 19
- 1 min read

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मंत्र्यांच्या डान्सबारवर बोलणे टाळले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारून सांगणार का? पत्रकारांनी उखाणा घ्यायला सांगितल्यासरखं नकार काय देात.. असा टोला त्यांनी चाकणकर यांना लगावला.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासवर सनसनाटी आरोप कर कदम यांच्या आडचणी वाढवल्या. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर मुंबईत सावली डान्सबार असून पोलिसांनी छापा टाकून तेथून 22 बारबाला ताब्यात घेतल्याचे सांगितले. ज्या खात्याचे मंत्री असतात, त्यासबंधी त्यांनी कोणताही उद्योग करू नये, असे संकेत आहेत. तरीही आपल्या पदाचा वापर करून राज्यमंत्री कदम यांनी डान्सबारवरील कारवाईदरम्यान हस्तक्षेप केला, असा गंभीर आरोप परब यांनी विधानपरिषदेत केला. त्यांच्या आरोपानंतर विरोधी पक्षानेही राज्यमंत्री कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, यासंदर्भातील प्रश्न महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारण्यात आला होता.यावर चाकणकर म्हणाल्या आमचे प्रदेशाध्यक्षांना विचारुन सांगेन, मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत त्यांची प्रतिक्रया याबाबत महत्वाची आहे.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की महिला आयोगाच अध्यक्षांना अजूनही त्यांचं काम माहित नाही. राज्यातील बार डान्स, बारबाला, सरकारमधील मंत्र्यांचा त्यात असलेला हस्तक्षेप किंबहुना संबंध यावर पत्रकार प्रश्न विचारत आहेत, जो महिलांशी संबंधीत आहे, महिला आयोगाशी संबंधित आहे.पत्रकारांनी उखाणा घ्यायला सांगितल्या सारखं काय नकार देता?
सगळच तुमच्या प्रदेशाध्यक्षांना विचारुन सांगाल का? मागच्या आठवड्यात एका सर्व्हेनुसार 2024-25 या कालावधीत 18 वर्षाखालील बेपत्ता मुलींची संख्या 4096 आहे आणि 18 वर्षावरील महिलांची संख्या 33599 इतकी आहे अशी माहिती खडसे यांनी दिली तसेच तुमचे महिला आयोग यावर काय पावले उचलत आहे? तुम्ही याबाबत काही धोरण तयार केले आहे का? असे सवाल करत सगळंच तुमच्या प्रदेशाध्यक्षांना विचारून सांगाला का? असा चिमटाही त्यांनी चाकणकर यांना काढला आहे.



Comments