उच्चशिक्षित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
- Navnath Yewale
- Feb 6
- 1 min read

बीड : उच्चशिक्षित तरुणाने जनावरांच्या गोठ्यासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.6) राक्षसभुवन-तांबा (ता. शिरुर कासार )येथे घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, शिरुर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राक्षसभुवन (तांबा) येथील अनंता प्रभाकर खोले वय 37 वर्षे या उच्चशिक्षित तरुणाने पैठण- पंढरपूर मार्गालगतच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यासमरील लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दिपक खोले यांच्या माहितीवरून शिरुर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी प्रेत हालावलेश. शिरुरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले. शिरुर पोलिस पुढील तपास करीत आहेत.



Comments