उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाणार - संजय राऊत यांचा दावा

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे तुम्हाला लवकरच आमच्या सोबत दिसतील. आच्या सोबत येण्याची त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे, असा दावा उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केला आहे. उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खसदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षात आहेत. त्यांनी तीन-चार पक्ष बदलले नाहीत. ते आमचे सहकारी आहेत. या दाव्यांना अर्थ नाही. स्वत:उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये चालले आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली हे तुम्हाला माहिती आहे का? असा दावा त्यांनी केला. आता संजय राऊत यांच्या दाव्यावर उदय सामंत काय बोलणार? याकडे सर्वांचे लागले आहे.
दरम्यान, मुंबईतील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आज कोकण भवनात जाणार आहेत. यावर संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे वंदनिय आहेत. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. पण शिंदे गटाकडून निषेधाचा एक शब्द नाही. शिंदे सेनेला बाळासाहेब वंदनीय नाही. शिंदेंची शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे. किती दिवस रुसून बसणार असा सवाल त्यांनी केला. फारतर एखादी साडीचोळी पदरात पाडून घेतली, असा टोला राऊतांनी शिंदे गटाला लगावला. तर मुंबईचा महापौर हा भाजपचा होईल, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, नाशिक प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्या विषयावर पडदा पाहिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये महिलेने निषेध व्यक्त केला, त्या महिलेचे मी कौतुक करतो. पण आता मंत्र्यांनी मूफी मागितली आहे. नाक घासलेलं आहे. आता फार विषय ताणू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.



Comments