top of page

उपमुख्यमंत्री अजित पवारांची आयपीएस महिला अधिकार्‍यास ‘दादागिरी’

Sep 4, 2025
1 min read

सामाजिक कार्यकर्त्यातून संताप; गुन्हा दाखल करण्याची मागणी


सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खननाविरोधात करावाईसाठी गेलेल्या करमाळा विभागाच्या पोलिस उपाधिक्षक अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन संभाषण व व्हिडीओ कॉल प्रकरण सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे . या प्रकरणी आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. करमाळ्यातील शेताकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.


माढा तालुक्यातील कुर्डु गावात एक महिला आयपीएस अधिकारी बेकायदेशीर मुरुम उत्खनन करणार्‍यावर कारवाई करायला जाते. अजित पवारांचे कार्यकर्ते वेढा टाकतात आणि अजितदादांना फोन करतात. यावेळी अजित पवार बोलतात तुझी दादागिरी झाली, तुझ्यावर कारवाई करेन. म्हणजे एका बाजूने लाडकी बहीण योना आणता दुसरीकडे आपल्या मुलीच्या वयासारख्या असणार्‍या महिला अधिकार्‍याला दम दिला जातो, असा अरोप खुपसे यांनी केला आहे.


त्या महिला अधिकार्‍याला चक्कर येते. प्रांत आणि तहसिलदारांच्या अंगावर लोक जातात. तलाठ्याला मारहाण होते. अजित पवारांचा फोन झाल्यानंतर त्यांना तिथून पळण्यात येते. पण, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. बीडचे वातावरण शांत करायला तुम्ही तिकडे पालकमंत्री झाला पण सोलापुरचे वातावरण विचित्र झाले आहे. अशी टीका अतुल खुपसे यांनी केली.

अतुल खुपसे म्हणाले की, आयपीएस अधिकार्‍यांना जर काम करता येत नसेल, स्पिकर फोन करून मानहानी होत असेल तर येणार्‍या आठ दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा. लाडक्या बहिणींची माफी मागावी, नाहीतर आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असा इशाराही खुपसे यांनी दिला आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजली कृष्णा यांच्या संवाद, व्हिडिओ कॉल व्हायरल प्रकरणी अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुष्मा अंधारे यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Comments

Couldn’t Load Comments
It looks like there was a technical problem. Try reconnecting or refreshing the page.
bottom of page