उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे कोळीवाड्यात आमने सामने !
- Navnath Yewale
- Aug 8
- 1 min read

वरळीमधील कोळीवाड्यात आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमनेसामने आले. ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यामध्ये धक्काबुक्की झाली.यावेळी गदारोळ करणार्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी हस्तक्षेप करणार्या पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. नारळी पोर्णिमे निमीत्त कोळी बांधव समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ वाहतात. नारळीच्या बत्तेरी जेट्टी येथे आदित्य ठाकरे कोळी बांधव यांच्यासोबत नारळ समुद्राला वाहणार आहे.
त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दखील बत्तेरी जेट्टी येथे कोळी बांधवांसोबत समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी आले. योवहभ हे दोन्ही नेते आमनेसामने आले. दोन्ही नेत्यांचे कोळी बांधवांनी स्वागत केले. यानंतर दोन्ही नेते एकमेकांसमोर आले असता दोन्ही नेत्यांसोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांना पाहण्यासाठी कोळी बांधवांची मोठी गदी जमली होती.



Comments