उपराष्ट्रपती पदाची निवडणुक; एनडीएच्या खासदारांचे डिनर रद्द, इंडिया आघाडीची बैठक लांबणीवर
- Navnath Yewale
- Sep 6
- 1 min read

उपराराष्ट्रपती पदाची निवडणुक 9 सप्टेंबरला होत असून दोन्ही सभागृहांचे खासदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुक चार दिवसावर आली असल्याने दिल्लीत सध्या हायहोल्टेज ड्रामा पहावयास मिळत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवास्थानी शनिवारी एनडीएच्या खासदारांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, अचानक डिनर रद्द करण्यात आले आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचीदेखील शनिवारी कोणतीही बैठक होणार नाही.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पर्श्वभूमिवर वगेवान घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या वतीने आजच्या दिवसात सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या महत्वाच्या बैठका अपेक्षित होत्या. पण त्या एकाएकी रद्द झालेल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीला केवह चार दिवसाचा अवधी शिल्लक असताना दोन्ही बाजूनी वेगवान घडामोडी घडताना दिसत नाहीत.
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी शनिवारी सायंकाळी एनडीएच्या सगळ्या खासदारांना जेवणासाठी बोलावण्यात आलं होतं. पण पंजाब, हिमाचल प्रदेशात आलेला पूर, त्यामुळे झालेलं नुकसान या पार्श्वभूमिवर डिनर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे एनडीएच्या गोटातील हायव्होल्टेज घडामोडींना ब्रेक लागला आहे. भाजपने त्यांच्या खासदारांना 6 सप्टेंबरपर्यंत दिल्लीत पोहोचण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे भाजपचे बहुतांश खासदार राजधानीत आहेत. दुसरीकडे शनिवारी इंडिया आघाडीचीही कोणतीही बैठक होणार नाही. शनिवारी रात्रीच्या सुमारास इंडिया आघाडीची व्हर्च्युअल बैठक होईल, अशी चर्चा होती. पण विरोधकांच्या आघाडीची कोणतीही बैठक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आगामी काळात होत असलेल्या या निवडणुकीत एनडीएची बाजू वरचढ दिसत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एनडीए बहुमतात आहे. त्यामुळे एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यांच्यासमोर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचे आव्हान आहे.



Comments