उमरखाडीत कलाकारांनीही लुटली चोर गोविंदाची मजा
- Navnath Yewale
- Aug 9
- 1 min read

मुंबई : नारळी पौर्णिमेनिमित्त उमरखाडीत परंपरेनुसार चोर गोविंदाचे आयोजन करण्यात आले होते. यंग उमरखाडी क्रिडा मंडळ आणि शिवसेना युवासेना मुंबादेवी विधानसभा विभाग संघटक रुपेश पाटील आणि महिला उपविभाग प्रमुख प्रिया पाटील पुरस्कृत चोर गोविंदा कार्यक्रमास टीव्ही चैनल व चित्रपट सृष्टीतील बड्या कलाकारांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून चोर गोविंदाची मजा लुटली अभिनेत्री लिसा सिंग नृत्यांगना गौतमी पाटील , अभिनेता सुशांत शेलार अभिनेत्री प्राप्ती रेडकर, बिग बॉस फेम दादुस चौधरी, रिल्सबाज तन्मय पाटेकर, गायक परमेश माळी मंचावर थांबून चोर गोविंदाची मजा लुटत होते.
चोर गोविंदाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय मंडळींनी देखील कार्यक्रमास हजेरी लावली होती शिवसेना भाजपा राष्ट्रवादी पक्षाच्या मातब्बर मंडळींनी चोर गोविंदाला हजेरी लावली . शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळे अभिनेता सुशांत शेलार , प्रवक्त्या शायना एनसी, नगरसेविका वंदना गवळी कार्यक्रमास उपस्थित होत्या नारळी पौर्णिमेचा हा उत्सव पाहून राजकीय मंडळींसह कलाकार देखील भारावून गेले होते. कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्तम रत्या केल्याने गोविंदा पथकांनी देखील आयोजक रुपेश पाटील यांची तारीफ केली.
गिरगावतील अखिल मुगभाट सार्वजनिक गोविंदा पथकाने आठ थर लावून उंच दहीहंडी फोडून चोर गोविंदाचा मनाचा चषक पटकावला आहे. या सराव शिबिराला ७० होऊन जास्त गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता त्याचबरोबर महिला गोविंदा. पथक देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. प्रत्येक गोविंदा पथकांना आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम भेट देण्यात आली होती. नृत्यांगना गौतमी पाटील हिने भाषण आणि नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली. अशाप्रकारे कलाकार मंडळींच्या उपस्थितीत चोर गोविंदाचा कार्यक्रम पार पडला.



Comments