top of page

उर्से आश्रमशाळेत साक्षरता,आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात


डहाणू : एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग डहाणू व सानवी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, उर्से येथे दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता साक्षरता व आर्थिक साक्षरता कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात तब्बल २९६ महिला पालकांचा  उत्स्फूर्त  सहभाग लाभला. कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती मातेची व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.


स्वागत नृत्य, विश्वस्तवन व स्वागत गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.या प्रसंगी प्रकल्प शिक्षण विस्तार अधिकारी शेटे, देशमुख, अधीक्षक राऊत यांच्यासह सानवी सामाजिक संस्थेचे इसा रावत, जिओ रोटी घरतर्फे राजेश शहा, सीमा आमरे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमादरम्यान पालक व विद्यार्थ्यांचा संवाद साधत साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.


विद्यार्थ्यांच्या मदतीने महिलांनी स्वतःची नावे लिहून घेतली,बाराखडी उच्चारली तसेच प्रतिज्ञा घेण्यात आली.मी शिकणारच, आई म्हणून मी शिकवणारच.”कार्यक्रमानंतर शाळेमार्फत सर्व उपस्थितांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच महिलांना साडी, साखरेचे पाकीट, चहा पावडर या स्वरूपात संघर्षी भेटवस्तू देऊन आनंद द्विगुणित करण्यात आला.या उपक्रमामुळे गावात शिक्षणाबाबतची जाणीव व महिलांमध्ये आर्थिक साक्षरतेबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


Comments


bottom of page