एकनाथ शिंदे यांच्या लाडक्यामंत्र्यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला काळे झेंडे अन् जोरदार घोषणांनी धाराशिव हादरले, पोलिस यंत्रणा धास्तावली

धाराशिव: अंतरवाली सराटीमध्ये गेल्या 13 दिवसापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे. गेल्या काही दिवसापासून मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात मोठ्या अडचणींचा समाना करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी करत पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. त्यातच आता धाराशिवमध्ये काळे झेंडे अन् जोरदार घोषणा देत मराठा आंदोलकांनी एकनाथ शिंदेंच्या लाडक्या मंत्र्यांचा ताफा अडवला. अचनाक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस यंत्रणा धास्तावली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एकेरी भाषा सहन केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मनोज जरांगे यांना दिला होता. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील मराठा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. शुक्रवारी (दि. 11) धाराशिवहून परंड्याकडे जात असताना मराठा कार्यकर्त्यांनी योगेश कदमांचा ताफा काळे झेंडे दाखवत अडवला. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, यापूर्वीच राज्यमंत्री योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एकेरी भाषा सहन केली जाणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर योगेश कदम शुक्रवारी (दि.11) धाराशिव जिल्ह्याच्या दौर्यावर होते. या दौर्यावेळी मराठा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. धाराशिवहून परंड्याकडे जात असतानपा मराइा कार्यकर्त्यांनी योगेश कदमांचा ताफा अडवत काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली.
धाराशिवहून परंड्याकडे जाणार्या मार्गावर या अचानक घडलेल्या प्रकारामुळे काहीकाळ वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी मराठा कार्यकर्त्यांची समजूत काढत पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्वरित मार्ग मोकळा करून दिला यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.



Comments