संभाजीब्रिगेडच्या पदाधिकार्यांनी एमपीएससीच्या सचिवांना काळं फासलं

नवी मुंबई : राज्यातील पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पेपरफुटी विरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी मोर्चाही काढला होता. या आंदोलनात विरोधी पक्षातील नेतेही सहभागी झाले होते. शासनाने एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. त्यानंतर सरकारनेही भूमिका स्पष्ट करत, पेपरफुटीत जे जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा इशारा दिला. एकीकडे कारवाई सुरू असताना आज संभाजी ब्रिगेडने च्या पदाधिकार्यांनी नवी मुंबईतील एमपीएससीच्या कार्यालयात घुसून सचिव महेंद्र हरपाळकरांना काळं फासल्याची घटना घडली.
राज्यात अगोदरच एमपीएससी विरोधात वातावरण तापलेलं आहे. अनेक प्रमुख शहरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आज छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा घेऊन गेले. अशावेळी ही घटना घडली. त्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अॅड. संतोष शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मोठा इशारा सुद्धा दिला आहे. दरम्यान या प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
ये तो सिर्फ ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी है, असा गर्भात इशारा संतोष शिंदे यांना दिला. आता फक्त आयोगाच्या सचिवाला काळ फासले आहे पुढे आयोगाचे अध्यक्षाला ही काळ फासू असा इशारा शिंदे यांनी दिला. प्रेमासाठी पेपर फोडला जातोय. कशासाठी पेपर फोडला जातोय. आयोगाचे अध्यक्ष आणि सरकारचे काय लागेबांदे आहेत, असा आरोप त्यांनी केला. हे सरकार निष्क्रिय ठरलेलं आहे. निवेदन आंदोलन करून गेंड्याची कातडीचा असलेल्या सरकारला काही फरक पडत नाही. मुख्यमंत्री नुसत्या बैठकांच्या शिदोर्या हाणत आहेत. म्हणून संभाजी ब्रिगेडच्या आमच्या कार्यकर्त्यांनी आयोगाच्या सचिवाच्या तोंडाला काळ फासलं हे फार चांगले केलं. आता जर सरकार काही निर्णय घेणार नसेल तर पुढचा नंबर आयोगाच्या अध्यक्षाचा असेल, असा इशाराही शिंदे यांनी दिला. संभाजी ब्रिगेड यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
परीक्षा पेपर फुटी प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक काही वेळापूर्वी एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या चेहर्यावर काळी शाई फासली होती. त्यानंतर तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अधकि तपास बेलापूर पोलीस करीत असल्याची माहिती नवी मुंबईचे डीसीपी अमित काळे यांनी दिली.
संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते काल सचिवांना भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी चर्चा केली. यानंतर काही कागदपत्रे दाखवायची आहेत यासाठी आजची वेळ घेतली. आज परत एकदा सचिवांना भेटले. यावेळी मोबाईल मध्ये कागदपत्र असल्याचे सांगून मोबाईल घेवून सचिव कार्यालयात गेले. यावेळी पुस्तक देण्याच्या बहाण्याने सचिवां जवळ जात काळी फुकटी त्यांच्या अंगावर टाकण्यात आली. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एमपीएससी कार्यालयात प्रवेश देण्याबाबत काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी मंत्री योगेश कदम म्हणाले की, संभाजी ब्रिगेडवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सचिवांच्या कार्यालयात जाऊन त्यांना काळे फासल्याच्या घटनेवर योगेश कदम यांनी भाष्य केलं. तुम्ही अशा प्रकारचे आंदोलन करून प्रसिद्धी मिळवतात, पण प्रश्न सुटणार नाही. एमपीएससी प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे. आम्ही प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. तरीदेखील राज्यात कायदा व सुव्यवस्था अशा आंदोलनामुळे निर्माण झाली त्याची खबरदारी घेतली जाईल, असे मंत्री योगेश कदम म्हणाले. धाराशिवमध्ये योगेश कदम यांनी पत्रकाराशी बोलताना भूमिका मांडली.



Comments