top of page

तुकाराम मुंढेच्या एफडीचा पुण्यातील बुधवार पेठेत छापा

3 hours ago
1 min read

पुणे : राज्यात सणासुदीचं वातावरण असून नपागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये रेलचेल सुरू आहे. विशेष म्हणजे, सणांच्या काळात गोडव्यासाठी मिठाईचं मुख्य आकर्षणही असतं. मात्र, आता ऐण सण- उत्सवातली हीच मिठाई तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. होय.. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीए अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. अशातच आता एफडीएच्या पथकानं पुण्यातील बुधवार पेठेत धाड घातल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.


पुण्यात एफडीएची कारवाई बुधवार पेठ परिसरातून 4 ट्रक पनीर आणि खवा जप्त, 5 हजार किलो खवा आणि 12 हजार किलो पनीर जप्त, ट्रक परराज्यातून आल्याचा संशय , जप्त केलेल्या साठ्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले.

दरम्यान, राज्यात गणेशोत्सवाच्या निमित्तानं खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळ रोखण्यासाठी एफडीए नं विशेष मोहिम राबवत भेसळखोरांना इशारा दिला आहे. तर दुसरीकडे एफडीए नं 4 ट्रक पनीर आणि खवा जप्त केल्यानंतर दुध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. गाई- म्हशीच्या दुधापासून शुद्ध पनीर बनवून विकत असल्याचा दावा शेतकर्‍यांना केला आहे.


खरंतर, डोंबिवलीत सांगलीहून आणलेले तब्बल 500 लिटर सुटे भेसळयुक्त दुध एफडीएनं नष्ट केलं. त्यानंतर आता एफडीएच्या धडक कारवाईमुळे पुण्यातील खाद्य व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. सणासुदीच्या काळातील मागणी पाहता अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे अनेक प्रकार घडत असतात. याच पार्श्वभूमिवर एफडीएनं आपली मोहिम आणखी तीव्र केली आहे. मात्र, नागरिकांनीही सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची खरेदी करताना खबरदारी बाळगणंही तितकचं गरजेचं आहे.

Comments


bottom of page