top of page

मंत्र्याचा भाऊ, पुतन्याला एका गटाकडून मारहाणसंभाजीनगरच्या बिडकीन हद्दीतील घटना; जखमी पुतण्याला संभाजीनगरला हलवले

3 hours ago
1 min read

छत्रपती संभाजीनगर: राज्यमंत्री अतुल सावे यांचे थोरले बंधू आणि पुतणे यांना शेती तसेच रस्त्याच्या वादातून एका गटाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव खंडेवाडी येथे घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या मारहाणीत अमेय अजित सावे (वय 35) आणि अजित मोरेश्वर सावे (वय 70) हे दोघे जखमी झाले आहेत. दोघेही खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर येथील रहीवासी आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव खंडेवाडी परिसरात शेतीच्या हद्दी तसेच रस्त्याच्या वापरावरून दोन गटांमध्ये वाद सुरू होता. याच वादातून दोन्ही बाजूमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर एका गटाकडून अमेय सावे अणि अजित सावे यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.


घटनेनंतर दोन्ही जखमींना तातडीने बीडकीन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, अमेय सावे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मारहाणीचे नेमके कारण आरोपींची संख्या आणि घटनेमागील संपूर्ण पार्श्वभूमी पेालिस तपासातून सष्ट होणार आहे.


दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आली नाही. किती जणांवर गुन्हादाखल होणार,वादाचे नेमके कारण, कारवाई संदर्भात पोलिसांकडून लवकरच माहिती देण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

Comments


bottom of page