महाराष्ट्रात ‘कुराश स्कॅम’ घोटाळा उघड, बनावट प्रमाणपत्रांच्या अधारे लाटल्या नोकर्याखरातला कारागृही धाडणार्या आयपीएस तेजस्वी सातपुतेंची धडाकेबाज कारवाई

पुणे: नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणी धडाकेबाज तपास करणार्या अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी आता बनावट प्रमाणपत्र प्रकरणाचा छडा लावला आहे. कुराश नावाच्या आंतरराष्ट्रीय खेळाच्या नावाखाली बनावट प्रमाणपत्र देण्याचं प्रकरण उघडकीस आलं असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, हे प्रमाणपत्र घेऊन पोलिस भरती आणि शासकीय नोकर्या लाटल्याचा प्रकार उघड झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी नाशिकच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची सविस्तर माहिती दिली. “ कुराश नावाचा आंतरराष्ट्रीय खेळ खेळला जातो. या खेळाच्या नावाखाली काही संस्था होत्या, ज्या देशपातळीवर असणार्या संघटनेशी संलग्न नव्हत्या. कुराशचे खेळाडू म्हणून त्यांनी काही प्रमाणपत्र वितरित केली. या प्रमाणपत्रांच्या आधारे खेळाडूंना 5 टक्के आरक्षण असतं, मुळात कोणताही खेळ खेळले नाही, अशा लोकांनी याचा लाभ घेता आहे. जे लायक उमेदवार आहे, जे खेळाडू आहेत त्यांच्यावर यामुळे अन्याय झाला आहे. याची गोपनिय महिती मिळाली, चौकशी नंतर हे बनावट प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार समोर आला.
दरम्यान, जे खेळाडू नाहीत अशांना हे प्रमाणपत्र देण्यात आल्याचंही आयुक्त सातपुते म्हणाल्या. विषेश म्हणजे शासकीय नोकरीसाठी बोगस प्रमाणपत्राचा आधार घेवून 5 टक्के आरक्षणाचा लाभही घेतला. या प्रकरणी दि.2 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आणि दोण जणांना अटकही करण्यात आली. प्रत्यक्षात आणखी किती खेळाडूंना प्रमाणपत्र मिळवली, किती लोकांनी बनावट प्रमाणपत्र देऊन पोलिस आणि शासकीय नोकर्या मिळवल्या त्याचा तपास सुरू असल्याचंही आयुक्त सातपुते यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यस्तरीय विजेता खेळाडू म्हणून हे प्रमाणपत्र वाटले आहे. 50 हजार ते 5 लाख रुपयांमध्ये बनावट प्रमाणपत्र दिली आहेत. त्याच अधिक तपास सुरू आहे. या आरोपींची ओळख ही खेळाडू म्हणूनच झाली आहे. ते खेळ खेळत होते. कुराश हा खेळ ज्युडो सारखा आहे. खूप कमी लोकांना हा खेळ माहिती आहे. बनावट प्रमाणपत्रांची संख्या तब्बल 1 हजार इतकी आहे. प्रमाणपत्र विभागाचं नाही, खेळाचं आहे . हा खेळ पोलिस भरतीमध्ये ग्राह्य धरला जातो. वर्ग एक आणि वर्ग दोन साठी याचा उपयोग केला आहे. पुणे पोलिसांच्या बाबतीत 104 खेळाडूंची पदं होती.19 पदांवर कुराश खेळाचं प्रमाणपत्र दिलं आहे. त्यांची भरती सुद्धा झाली आहे. त्यापैकी 10 जणांना हजर केलं असून चौकशी सुरू आहे. अजून 9 उमेदवार हजर झाले नाही. त्यांच्याकडे असलेली प्रमाणपत्र ही वैध प्रमाणपत्र आहे की चुकीच्या पद्धतीने घेतले असेल , तर चौकशी करून योग्य निर्णय घेतला जाईल असंही त्या म्हणाल्या.
याव प्रकरणी अंकुश नागर आणि शिवाजी साळुंखे यांना अटक करण्यात आलं आहे. यामध्ये राज्य पातळीवरली दोन संघटना होत्या. कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र असं संघटनेचं नाव आहे. 2012 ते 2026 कुराश असोसिएशन दोन संघटना होत्या. या दोन्ही संघटनात वाद होता. 2026 पासून वेगळी संघटना यात काम करत आहे. एक संघटना ही सलग्न होती, देशपातळीवर संघटनेसोबत काम करत होती. नंतरच्या काळात दुसरी संघटना आली. त्यामुळे त्या संघटना संलग्न असतानाच्या काळात प्रमाणपत्र वाटली का? योग्य स्पर्धा घेवून प्रमाणपत्र दिली आहेत का? खेळाणारे खेळाडू वेगळा आणि प्रमाणपत्रावर नावा असणारा व्यक्ती दुसरा आहे का? असं संशय सातपुते यांनी व्यक्त केला.
क्रिडा विभाग आणि अरोपीचा त्याच्या अधिकारी काही संबंध याचा तपास केला जात आहे. पुणे शहराबाहेर ही या गुन्ह्याची व्याप्ती असू शकते तसा तपास सुरू आहे. आरोपी अटक झालेले आहेत अहिल्यानगर आणि कोल्हापूरमध्ये देखील पुणे पोलिसांनी पंचनामे केले आहेत. या प्रकरणी दोघांना अटक केली या प्रकरणी पुणे पोलिस गुन्हे शाखा तपास करत आहे.



Comments