top of page

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचं बीड कनेक्शन, तीसर्‍या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवं वळण आलं आहे. या प्रकरणात एका नवीन व्यक्तीचा संबंध समोर आला आहे. पोलिसांनी केतन अग्रवाल हत्येप्रकरणी तिसर्‍या आरोपीला अटक केली आहे. सिया आणि चेतनसह त्याला सह-आरेापी करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन आरोपीचं नांव चेतन चौधरीचा वर्गमित्र ‘ रितेश हिंगे’ असं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालची हत्या करण्यात आली होती. हत्याकांडाचा माहिती रितेशला होती. चेतन चौधरी आणि त्याची मैत्रीण सिया गोयल यांनी रितेशसोबत हत्येचा कट रचला होता. केतनची हत्या कशी करायची, यावर सविस्तर चर्चा केली होती. तसेच सिया आणि चेतनने त्याला लोहगडला सोबत येण्यासाठी वारंवार आग्रही केला होता. दरम्यान रितेशने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला होता.


परंतु रितेशला केतनच्या खुनाच्या संपूर्ण कटाची आधीच कल्पना होती, असा पोलिसांना संशय आहे. केतन अग्रवालच्या हत्येनंतर चेतन चौधरी याने या मित्राची भेट घेतली होती. तसेच सिया गोयल ही देखील त्याच्या संर्कात होती, अशीही माहिती आहे. चेतन चौधरीच्या फोनवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या रितेशला शोधून काढलं.


आरोपी हा बीड जिल्ह्यातील मुळ रहिवासी असून बालेवाडीतील एका खासगी कंपनीत काम करतो, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो चेतन चौधरीच्या संपर्कात होता. चौकशीदरम्यान, या कटाबद्दल त्याला नेमकी किती माहिती होती आणि गुन्हयात त्याची काय भमिका होती, हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.


18 जून रोजी लोहगड किल्यावर घडलेल्या घटनाक्रमाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा पोलिस सध्या प्रयत्न करत आहेत. कोणाला परिस्थितीची कल्पना होती आणि कोणाला नव्हती, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, तपासादरम्यान आणखी एका आरेापीचे नाव समोर आले आहे, या नवीन घडामोडीवरून असे सूचित होते की, हे प्रकरण आता केवळ दोन अरोपींपुरते मर्यादित राहिलेले नाही हे निश्चित!

Comments


bottom of page