top of page

एफडीए च्या छापेमारीने भेसळमाफियांच्या झोपा उडाल्या;मात्र बीड अपवाद?, गाई-म्हशी नगन्य, मात्र दुधाचा महापूर; प्रतिबंधित गुटखा-मावा,पानमसाल्याची सर्रास विक्री?

बीड: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात धकड कारवाईचा धडाका लावला आहे. अवघ्या काही दिवसांत राज्यभरात शेकडो छापे टाकत हजारो किलो भेसळयुक्त अन्न, प्रतिबंधित गुटखा आणि बनावट औषधी साठा जप्त करण्यात आला असून शेकडो जणांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, यास बीड जिल्हा अपवाद ठरतोय? गाई- म्हशी नगन्य असताना जिल्ह्यात दुधाच महापूर आल्याचे चित्र आहे.


दुधाळ जणावरांच्या तुलनेत पटीने दुध उत्पादन हा विषय भेसळयुक्त पदार्थाकडे बोट दाखवत असला तरी जिल्हा अन्न सुरक्षा अधिकार्‍यांना अद्याप त्याचा सुगावा लागलेला नाही. दुग्धजन्य खाद्य पदार्थांची बाजारात मुबलक उपलब्धता? प्रतिबंधित गुटखा, मावा, पानमसाल्याच्या सर्रास विक्रीबाबत दबक्या आवाजात चर्चा आहे.


राज्यातील दुध संकलनावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील वर्षी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. दुधाळ जणावरांच्या तुलनेत पटीने होणार्‍या अतिरिक्त दुधसंकल भेसळीचे चित्र स्पष्ट करणारे असले तरी, दिवंगत अजित दादांच्या शंकेला वाचा फुटली ती तुकाराम मुंडे यांच्या धाडसी कारवायाने

महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध विकास विभागाने जाहिर केलेल्या मागील काही महिन्याच्या आकडेवारीनुसार राज्यात प्रतीदिन 1 कोटी 75 लाख लिटर दुध संकलन होते.


यामध्ये जिल्हानिहाय आकडेवारीनुसार राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 40.58 लाख लिटर दुध संकलन होत होते. दुसर्‍या क्रमांकावर पुणे 29. 56 लाख लिटर, तिसर्‍या क्रमांकावर कोल्हापूर 16. 80 लाख लिटर, चौथ्या क्रमांकावर सातारा 16.52 लाख लिटर, पाचव्या क्रमांकावर सांगली 15.60 लाख लिटर दुध संकलानाची आकडेवारी जाहीर केली होती. मात्र तुकाराम मुंडे यांनी एफडीए च्या आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांत राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील दुध संकलनामध्ये तब्बल 20 ते 25 टक्के घट झाल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात एफडीएच्या धाडसत्राने भेसळयुक्त दुधाचे संकलन घटल्याचे वास्ताव या आकडेवारीतून समोर आले आहे.


तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईने नागरीकांच्या आरोग्याचा खेळ मांडणार्‍या भेसळमाफियांचे धाबे दणाणले आहेत.दुध, पनीर, खवा यासह प्रतिबंधीत गुटखा- मावा, पानमसाला विक्रीला चांगल्या प्रकारे चपराक बसली असली तरी, अद्याप बीड जिल्हा मात्र यास अपवाद ठरला आहे. जिल्ह्यात गाई- म्हशींच्या तुलनेत दुध संकलानाची आकडेवारी निश्चित अधिकची आहे. पानटपर्‍यांवर प्रतिबंधित गुटखा, मावा पानमसल्याची सर्रास विक्री जिल्ह्यात सर्वसमान्यांना अश्चर्याचे धक्के देत आहे.


जिल्हा अन्न सुरक्षा अधिकार्‍यांना अद्याप भेसळीच्या उगमस्थानासह प्रतिबंधित गुटखा-मावा, पानमसाला विक्रीची अद्याप सुगावा लागत नसल्याने बाजारात पनिर वगळता दुग्धजन्य खाद्य पदार्थांच्या विक्रीवर राज्यातील एफडीएच्या कारवाईचा तसूभरही परिनाम झाल्याचे दिसून आले नाही.


अन्न सुरक्षा अधिकार्‍यांच्या फेर्‍या अन्..: मागील काही दिवसापासून अन्न सुरक्षा विभागाचे पथक शिरुर कासार तालुक्यात फेर्‍या मारत असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत असली तरी चाहूल लागताच शहरातील सबंधीत खासगी अस्थापना शटर बंद होत आहेत. त्यामुळे आले आणि हात हालवत गेले असेच चित्र सध्या जिल्हाभरात अन्न व औषध प्रशासनाचे पाहावयास मिळत आहे.

तुकाराम मुंडे यांनी राज्यात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेत शेकडो धाडी टाकून 192 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. सुमारे चार कोटींपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ज्यामध्ये दुषित खवा, रसायनांचा वापर करून पिकवलेले आंबे, बनावट तूप, भेसळयुक्त पनीर बनवणार्‍या व साठवणार्‍या 86 हून अधिक अस्थापनांना टाळे ठोकण्यात आले आहेत.

Comments


bottom of page