धक्कादायक: नीट चा पेपर एनटीए मधूनच फुटला?
- Navnath Yewale
- 1 day ago
- 2 min read

नीटचा पेपर कसा फुटला, नाशिक,पुणे, अहिल्यानगर, लातूर, ठाणे कनेक्शन समोर येत असतानाच धक्कादायक माहिती समोर येत आहे. नीटचा पेपर नाशिक किंवा अन्य दुसरीकडे फुटला नसून तो चक्क नीट परीक्षा घेणार्या एनटीएच्या ऑफिसमधूनच फुटला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास यंत्रणांनी आता या दिशेने तपासाची सुत्रं फिरवली आहेत
देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीट परीक्षेबाबत पुन्हा एकदा पेपरफुटीच्या आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. परीक्षा सुरु होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झल्याचा दावा करण्यात आल्यानंतर लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक राज्यांमध्ये संशयितांवर कारवाई करण्यात आली असून,तपास यंतणांनी या प्रकरणाचा मोइा रॅकेट म्हणून तपास सुरू केला आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी उमेदवारांकडून मोठी रक्कम घेऊन प्रश्नपत्रिका पुरवल्याचा आरोप आहे. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये पोलिसांनी छापेमारी करून काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. काही संशयितांकडून मोबाईल फोन, लॅपटॉप आणि दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणामुळे नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. अने विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, वर्षभर मेहनत घेऊन अभ्यास करणार्यांवर अन्याय होत असून, पेपरफुटीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
दरम्यान, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पेपरफुटीच्या आरोपांची चौकशी सुरू असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. काही प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशीचीही मागणी जोर धर आहे.
गेल्या काही वर्षात देशभरात विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये पेपरफुटीच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. नीट प्रकरणामुळे पुन्हा एकदा परीक्षा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या संपूर्ण प्रकरात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली असून, पेपरफुटीमागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.



Comments