top of page

मणिपुरमध्ये पुन्हा हिंसाचार; नागरिकांवर सशस्त्र हल्ला, गोळीबारात चौघांचा मृत्यू

2 hours ago
1 min read

इम्फाळ: मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांतील तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. इम्फाळ पूर्व आणि कांगपोकपी जिल्ह्यांच्या सीमावर्ती जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या नारिकांवर सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत एकून चार नागरिकांचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जण जखमी झाले आहेत. तसेच आणची तिघे बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मृतांमध्ये अरुबाम रोनिल (35) लैरेंलाकपम इनाओबी (51) आणि क्षेत्रीमायुम सुशील (32) यांचा समावेश आहे. रोनिल आणि इनाओबी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सुशील यांचा रुग्णालयात उपचार सुरू असतना तृत्यू झाला. जखमींनास पुढील उपचारांसाठी इन्फाळमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या हल्ल्यामागे कुकी अतिरेक्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत असला, तरी हल्लेखोरांची ओळख आणि घटनेचे नेमके कारण आद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या घटनेच्या तपासाकडे आणि सुरक्षा यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

गोळीबाराच्या घटनेची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त आंदोलकांनी मृतदेह मुख्यमंत्री वाय खेमचंद सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर नेऊन निषेध व्यक्त केला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नकळांड्याच्या वापर केल्याची माहिती आहे. या आंदोलनामुळे परिसरातील तणाव आणखी वाढला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.


दरम्यान, मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये जातीय संघर्षाच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारात अनेकांना जीव गमवावा लागला असून, घरे आणि मालमत्तांचे नुकसान झाले आहे. मोठ्या संख्येने नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. इन्फाळ पूर्व आणि कांगपोकपी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात यापूर्वीही हिंसक घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत ताज्या गोळीबारामुळे नगरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. या घटनेमुळे दोन्ही समदायांमधील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात असून, संवेदनशील भागांतील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

Comments


bottom of page