एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांचा उद्या चक्काजाम
- Navnath Yewale
- Sep 30
- 1 min read
राज्यभरातला धनगर बांधवास मेंढ्या घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचे दीपक बोर्हाडे यांचे आवाहन

जालना: राज्यातील धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे दीपक बोर्हाडे उपोषणास बसले आहेत. बोर्हाडे यांच्या आंदोलनाच आज 14 वा दिवस, नुकतेच राज्य मंत्रीमंडळाच्या शिष्टमंडळाने आंदोलनकर्ते दीपक बोर्हाडे यांच्याशी आंदोलनस्थळी चर्चा केली होती. मात्र, मागण्यांवर ठाम दीपक बोर्हाडे यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या राज्यभरातील धनगर समाजचा चक्का जाम आंदोनाची इशारा देण्यात आला आहे.
राज्यात मराठा आरक्षणाप्रमाणेच धनगर आरक्षणाची मागणीही गेल्या चाळीस वर्षापासून होत आहे. राज्य सरकाने मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढला. धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची प्रलंबीत मागणी मान्य करून समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी दीपक बोर्हाडे 17 सप्टेंबर पासून जालना येथे उपोषण सुरु केले आहे.
दरम्यान, दीपक बोर्हाडे यांच्या आंदोलना समर्थनात जालना येथे धनगर बांधवांचा विराट मोर्चा काढण्यात आला होता. राज्य मंत्रीमंडळाच्या शिष्टमंडळाने आंदोलनकर्ते दीपक बोर्हाडे यांच्याशी आंदोलनस्थळी चर्चा केली. धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण प्रक्रियेत कायदेशीर पेच असल्याने मार्ग काढण्याचे अश्वासन शिष्टमंडळाने दिले. मात्र आंदोलनकर्ते दीपक बोर्हाडे यांनी अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम राहत आंदोन मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ ठरली. धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी दीपक बोर्हाडे यांनी आता तीव्र आंदोलनाची हाक देत चक्का जाम चा इशारा दिला आहे.
राज्यभरातील धनगर समाज उद्या दि.1 ऑक्टोबर रोजी महिला, पुरुषांसह मेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला आहे. रुग्णवाहिका वगळता ईतर कुठलेही वाहन जाऊ देणार नाहीत असा इशाराही आंदोलनकर्ते बोर्हाडे यांनी दिला आहे. उद्याच्या चक्काजाम आंदोलनामध्ये धनगर बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहनही आंदोलनकर्ते दीपक बोर्हाडे यांनी केले आहे.



Comments