top of page

ओबीसीतल्या छोट्या जातीतले अधिकारी झाले तर आनंद..पण तुम्ही होवू देणार का?; 70 वर्षात का होवू दिले नाहीत- जरांगे पाटील

ree

जालना : अखिल भारतीय महात्माफुले समता परिषदेच्या वतिने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी एल्गार सभेतून जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. एल्गार सभेची सांगता होते न होतेच जरांगे पाटील यांनी तातडीने पत्रकार परिषदेतून मंत्री भुजबळ यांच्यासह आमदार धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार पलटवार केला.


मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. आमदार धनंजय मुंडे यांच्या टीकेवर प्रत्यूत्तर देत जरांगे पाटील म्हणाले की, संपलेल्या माणसांवर काही बोलू नाही, निवडणून आणल्यावर म्हणतोय मी पडलो का. मी मुख्यमंत्रीताईला काही बोललोच नाही, पण तुझी जुनी क्लिप काढून पहा, आपल्याला निधी बाबत काय कमी आहे, मुख्यमंत्र्याची काय माय व्याली, पंतप्रधानांची काय माय व्याली ही क्लिप विरोधी पक्षनेता असतानाची आहे. ते विसरले का फडणवीस साहेब. मी त्याच्या वैयक्तिकरित्या प्रकरणावर कधी बोललो नाही.


चार दिवसा पूर्वी त्याची बायको येवून गेली त्या म्हणाल्या लागल ते आहे माझ्याकडं. पण मी म्हटलं तुमचं वैयक्तिक मॅटर आहे यामध्ये मी पडणार नाही म्हणून मी काढून दिल त्यांना. आमची बाईच्या आडून कधी वार करणारी आवलाद नाही. मी त्याच्या चष्म्यावर मी कधी बोललो, तुलाच राहुदे तो चष्मा त्या चष्म्यात काय आहे ते सगळ्यांना माहित आहे. रक्ताने हातं भरलेला. छगन भुजबळ बीडच्या मराठ्यांवर दहशत बसवण्यासाठी आलंय इकडं. बीडची भूमि देशाला दिशादर्शक ठरणार आहे, बीडच्या मराठ्यांनी लक्षात ठेवावं.


छगन भुजबळांच्या एकदिवस गरिब ओबीसी तुम्हाला सतरंज्या उचलायला लावणार या वक्तव्यावर जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला आनंद आहे गरीब ओबीसीची लेकरं अधिकारी झाले तर, पण तुम्ही होवू द्यायला पाहिजे. गरीब परिट, न्हावी, साळी, कोळी, धनगर, तेली, तांबोळी आदी ओबीसीतल्या छोट्या जातीमधील लेकांर अधिकारी व्हायला पाहिजेत त्यात आम्हाला आनंदच आहे पण तुम्ही होवू देणार का? गेल्या सत्तर वर्षात का होवू दिले नाहीत.


परीट, साळी, कोळी, बंजारा, न्हावी यांचे आमदार, खासदार तुम्ही होवू देणार का? आम्हाला आनंद आहे असं म्हणत छगन भुजबळ यांची अक्कल दाढ पडली आहे असा पलटवारही जरांगे पाटील यांनी केला. छगन भुजबळ यास माहित आहे की, आपल्याला सगळ्यांनी सोडलंय. धनंजय मुंडे याला बळीचा बकरा बनवलं जातंय. वडेट्टीवार यांनी येवल्याच्या आलिबाबाच्या ( भुजबळ) नादी लागू नये त्यांनी पहिल्या भुमिकेत यावं.


आजच्या एल्गार सभेच्या ठिकाणी आमची घोंगडी बैठक झालेली आहे. तुम्ही ओबीसीचा अर्थ समजून घ्या, छगन भुजबळ ओबीसीचा नेताच नाही. बीडच्या छत्रपती संभाजीराजे मैदानामध्ये आमची घोंगडी बैठक झालेली आहे. त्यामुळं फडणवीस साहेब त्याला किती गिणीनार, कारण हा सरकारमध्ये राहून पिव्वर वादं लावतोय. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लोकसभेलाच आलं. मराठ्यांशिवाय या राज्यात सत्ता मिळवता येऊ शकत नाही. फडणवीस साहेबांना पत्रकार परिषदेतून सांगतो तो ( भुजबळ) सरकारमधी आहे. तो जातिय दंगली घडवणार आहे, बीडमध्ये भयावह वातावरण तयार केलं आहे त्याने आज. त्याने काही जातीचे नेते हाताशी धरले.


गृह मंत्रालयाने तो जामिनवर आलेला आहे, त्याची जामीन रद्द करावी. राज्यात आराजकता माजवील, रक्तपात घडवून आणील. गृहमंत्रालयाने दखल घेवून त्याची जामिन तातडीने रद्द केली पाहिजे. नसता तो हे टाबरं- टूबरं गोळा करून वातावरण बिगडून टाकील. बीड जिल्ह्यावर त्याने जी दहशत निर्माण केली आहे. ती सुद्धा आम्हाला तोडून काढावी लागावी लागणार आहे. आम्ही सुद्धा करणार आता. विखेंचं तुमच्यानी काही होणार नाही. बिचारा भेटायला आला तरी समाजाला काही देण्यासाठी येतो. तो कोणाचं रद्द करा म्हणालया आला का? ओबीसींच रद्द करा असं कोणता मराठा नेता आला का? मराठ्यांच्या नेत्याची बरोबरीच तुम्ही कधी करू शकत नाहीत.


दम्यान, हाकेंसह इतरांच्या प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले की, थुकलेलं कधी चाटीत नाहीत. त्याला आम्ही विरोधक मानलंही नाही आणि माणनारही नाहीत.


Comments


bottom of page