कौलाळे येथे ‘आमच्या गावात, आमचे सरकार’
- Navnath Yewale
- Aug 12, 2025
- 1 min read
ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पेसा ग्राम कोष समितीच्या सभेचे आयोजन

जव्हार : कौलाळे ग्रामपंचायत हद्दीत आज पेसा कायद्यांतर्गत ग्राम कोष समिती बैठकीचे दि. १४ आगस्ट २०२५ रोजी कौलाळे शिवमंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे . या बैठकीस संयुक्त पेसा ग्राम कोष समिती गावांना ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला बचतगट सदस्य व युवक मोठ्या संख्येने नागरिकांना उपस्थित राहण्याचा ग्रामपंचायत आवाहन येत आहे.
बैठकीत ग्राम निधीच्या पारदर्शक व नियोजनबद्ध वापराबाबत चर्चा करण्यात येणार असून . पेसा कायद्याच्या तरतुदीनुसार ग्रामसभा व ग्राम कोष समितीमार्फत गावातील विकासकामांना प्राधान्य देणे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण या विषयांवर ठोस निर्णय घेण्यात येणार.
या वेळी ग्रामपंचायत ग्राम कोष सदस्य महिला व पुरुष,सरपंच वैशाली अशोक धोडी /गरेल , उपसरपंच,प्रदीप निकुळे, ग्रामसेवक,विठ्ठल माळी तसेच सामाजिक कार्यकर्ते नागरिक उपस्थित राहावे . ग्राम निधीचा वापर शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व रस्ते विकासासाठी करण्याचे ठरले. बैठकीत ग्रामस्थांनी पारदर्शकता व लोकसहभागाच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्राम कोष समितीचे कामकाज नियमित व प्रभावी करण्याची मागणी केली.



Comments