top of page

कर्जमाफीतील जाचक अटीशर्तीच्या विरोधात रोहित पवारांचा एल्गार पंढरपुरात पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

गेल्या काही वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकारकडून सरकारकडून कर्जमाफीची अशा होती. परंतु सरकारने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीतील जाचक अटी शर्तींमुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफिपासून वंचित राहणार आहेत असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या जाचक अटी आणि शर्ती काढून शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अन्यथा पंढरपूरात आपण उद्या शुक्रवार दि.12 जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहोत असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.


शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी शिथील कराव्यात आणि शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, गेल्या तीन-चार वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटात सापलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीची अशा होती. परंतू सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी शर्तीमुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत.


राज्य सरकाने कर्जमाफी योजनेतील या जाचक अटीशर्ती काढून शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासह सर्व महामानवांच्या प्ररेणेने विठुरायाच्या पंढरीत 12 जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठीचा हा लढा आहे, सर्वांनी शक्य त्या पद्धतीने या लढ्याला सहकार्य करून शेतकर्‍यांचा आवाज बुलंद करावा, ही विनंती! आपल्या या आंदोलनासाठी आठवड्याचा वेळ आहे. तोपर्यंत सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, ही अपेक्षा!


छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक असलेल्या परिसरात पंढरपूरात शेतकरी कर्जमाफीसाठी आम्हाला ‘ अन्नत्याग’ आंदोलन करायचं आहे आणि ते होणारच आहे. ही बाब या परिसरातील स्टॉलधारकांना समजल्याने आणि आमच्या शहराध्यक्षांनीही त्यांना विनंती केल्याने या सर्व स्टॉलधारकांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी होणार्‍या या प्रामाणिक आंदोलनाला पाठींबा देत तातडीने जागा उपलब्ध करून दिली. ही आहे माणुसकी, महाराष्ट्र धर्म आणि शेतकर्‍यांविषयीचं प्रेम. पण जी गोष्ट सामान्य जनतेला कळते ती सरकारला कळत नाही, हे दुर्दैव आहे असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Comments


bottom of page