ह्रदयविकाराने मृत्यू: वैमानुष्यातून पठाण कुटुंबीयांवर खोटा गुन्हा?शवविच्छेदन अहवालापूर्वीच पोलिसांची घाई; समाजिककार्यर्त्यांची पोलिस अधिक्षक, पोलिस निरिक्षकांकडे धाव
- Navnath Yewale
- 15 hours ago
- 2 min read

बीड: जिल्ह्यातील मानूर (नागनाथ) येथे ह्रद्यविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यूनंतर मयताचे शव शिरुर कासार पोलिस ठाण्यात आणले. शवविच्छेदन अहवालापूर्वीच कसलीही शहानिशा न करता स्थानिक राजकीय वैमानुस्यातून पोलिसांनी तक्रादाराच्या जबाबानुसार पठाण कुटुंबीयांवर गंभीर खोटे गुन्हे दाखल केल्याचा अरोप करण्यात आला आहे. सामाजीक कार्यकर्ते, समाजबांधवांनी पोलिस अधिक्षक, पोलिस निरिक्षकांना मागण्याचे निवेदन देत प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
मानूर(नागनाथ) येथे ह्रद्यविकाराच्या मृत्यूने मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी मयताचे शव शिरुर कासार (जि.बीड) पोलिस ठाण्यात आणले. स्थानिक राजकारणाच्या वैमानस्यातून तक्रारदाराने सामाजिक कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्याची तक्रार दाखल केली. बीड पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षेची तसदी घेतली नाही, शिवाय घटनेची शहानिशा न करता फिर्यादीच्या जबाबानुसार सामाजिक कार्यकर्ते मुजूर पठाण, खलंदर पठाण, शेरखान पठाण, मोहब्बत पठाण, अयुब पठाण, दिलदार पठाण, अरवाज पठाण, यांच्यासह इतरांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप निवेदनाद्वारे केला आहे.
स्थानिक राजकारणाच्या वैमानस्यातून काही निरापराध व्यक्तींना या प्रकरणात ठरवून गुंतवण्यात आल्याचा आरोप करण्यात आहे. शिवाय गुन्ह्यात नमूद व्यक्ती घटना घडली त्यावेळी घटनास्थळावर नव्हते, काही बाहेरगावी होते तसे पुरावेही पोलिस अधिक्षकांना सादर करणार आहोत, त्यांचे मोबईल लोकेशन, साक्षिदार, तांत्रिक पुरावे तपासल्यास सत्या समोर येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर घटनेची सत्यता समोर येणार हे सूर्य प्रकाशा इतके सत्य आहे. केवळ मयतांच्या कुटुंबीयांनी शव पोलिस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता पठाण कुटुंबीयांवर राजकीय वैमानस्यातून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही पठाण कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
प्रकरणाची सखोल चौकशी करून निरापराधावरील खोटे गुन्हे मागे घेवून न्याय द्यावा, तसेच राजकीय वैमानस्यातून दाखल करण्यात आलेल्या खोट्या तक्रारारीची निष्पक्ष, कसून चौकशी करण्याची मागणी मानुर ग्रामस्थ, समाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांच्याकडे केली आहे. शिरुर कासार पोलिस निरिक्षकांनाही तालुक्यातील समाजबांधवांनी निवेदनाद्वारे गुन्हे रद्द करून निष्पक्ष चौकशीची निवेदनाद्वारे मागणी केली, यावेळी शेख शफिक, फारुक पटेल, भागवत तावरे, मोईन मास्टर, लयतुल्ला खान, बरकत पठाण, नजीम इनामदार, जमीर बागवान, अमित पटेल यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार निलेश लंके यांच्या स्वीय्य सहाय्यकास गोवण्याचा प्रयत्न : या प्रकरणात अहिल्यानगरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांचे खासगी स्वीय्य सहाय्यक अरबाज पठाण हे घटना घडली त्यावेळी दिल्लीला असताना त्यांच्यावरही खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठाण दिल्लीला असल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकरणात राजकीय वैमानस्यातून अरबाज पठाण यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा अरोपही करण्यात आला आहे.



Comments