देशात हिंदू-मुस्लिमचे राजकारण चालणार नाही - अभिजीत दीपके पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन; 20 जून ला पुन्हा दिल्लीत आंदोलनाचा इशारा

पुणे: दिल्लीतील जंतरमंतर नंतर कॉक्रोच जनता पार्टीचे आज पुण्यात आंदोलन झाले. सावित्रीबाई फुले विद्यापीठ परिसरात झालेल्या आंदोलनास राज्यासह परराज्यातून युवक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनास सोनम वांगचुक यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची प्रमुख उपस्थिती होती. नीट पेपरफुटी प्रकरणावरूनप अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत पुन्हा दिल्ली चलो चा नारा देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नीट पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोज जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतर वर आंदोलन केले. दिल्लीतील आंदोलना नंतर पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत गुषवारी (दि.11) पुण्यात आंदोलनाची घोषणा केली होती. सावित्रीबाई फुले विद्यापीठ परिसरात आज दुपारपासून युवक ‘कॉक्रोज’च्या वेशात हजर होते. हाता फलक घेवून सकाळपासूनच युवकांचे जथ्थे सावित्रीबाई विद्यापीठाच्या दिशेने सरसावत होते. सायंकाळी अभिजीत दिपके, सोनम वांगचुक, सामाजिक कार्यकर्ते श्री. चौधरी, श्री. कुंभार, अॅड. असिम सरोदे आंदोलनस्थळी दाखल झाले. तत्पुर्वी अभिजीत दीपके यांनी पत्रकार परिषद घेवून आंदोलनाची माहिती दिली. जोपर्यंत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा यावेळी अभिजीत दीपके यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

आंदोलनास मार्गदर्शन करताना अभिजीत दीपके म्हणाले की, नीटचे 22 लाख विद्यार्थी, सीबीएससीचे 17 लाख विद्यार्थी, सीयूजी चे 16 लाख विद्यार्थी, एसएससी जेडी चे 40 लाख विद्यार्थी अशा एकूण एक करोड पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार नाही, बिनलाज्या प्रमाणे खुर्चीला चिकटून आहात. माझा आपल्या विश्वगुरू, महामानव (पंतप्रधान मोदी) सवाल आहे की, तुम्हाला एक करोड यांना माझा प्रश्न आहे की, तुमच्यासाठी एक करोड महत्वाचे का एक मंत्री?, तुम्ही जर त्यांना काढणार नसाल तर तुमचेही ट्रान्सपर करण्यात येईल असा इशराही दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाव न घेता दिला. अभिजीत दिपके बोलत असताना उपस्थितांतून ‘ धमेंद्र प्रधान राजीनामा दो’ ची प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत होती.
पुढे बोलताना दीपके म्हणाले की, गेल्या 10-12 वर्षात देशात नुसतं हिंदू- मुस्लिम सुरू आहे. यापूढे हिंदू- मुस्लिम चालणार नाही, आम्ही चालूही देणार नाही. देशात गेल्या 40 वर्षात आज सगळ्यात जास्त इन्क्रॉमेंट झाले आहे. ती केवळ हिंदू- मुस्लिममध्ये अडकवून ठेवल्याने असा अरोपही दिपके यांनी केला. हिंदू- मुस्लिम म्हणून आम्हला मिळतंय काय?,तर रस्त्यावर खड्डे मिळतात, कोसळणारे पुल मिळतात ज्यामध्ये हिंदू ही मरतो आणि मुस्लिमही मरतो. यापूढे हिंदू- मुस्लिम कोणीही करणार नाही असं म्हणताच उपस्थिांतून ‘ हम सब भाई-भाई ’ चा नारा देण्यात आला. शुक्रवार दि.19 पर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही घेतला, तर आम्ही शनिवारी (दि.20) आम्ही सर्व पुन्हा दिल्ली गाठू आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत तोपर्यंत दिल्ली सोडणार नाही असा इशारा देत त्यांनी उपस्थित आंदोलकांना ‘ चलो दिल्ली’ चे अवाहन केले.
त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसी बोलताना कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलना बाबत ‘ज्यांना संविधान माहित नाही तेच संविधान घेवून विरोधी भूमिका घेत आहेत. आरजकता पसरवणारी पार्टी म्हणून संबोधले होेते. यावेळी अभिजीत दीपके यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या टप्पणीचा समाचार घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करणारे अराजकता पसरवतात का? जय भीम चा नारा देणारे अराजकता पसरवतात का? राहिला संविधान कळत नसल्याचा विषय तर कुठे संविधानात लिहीलं आहे पहाटे 5:00 वाजता शपथविधी घेण्याचं अशी मिश्कलीची टीकाही दीपके यांनी केली.
सरकारला जाब विचारणार्यांना पाकिस्ताणी म्हणून संबोधलं जातंय, स्टेजवर सोनम वांगचुक आहेत त्यांनाही अॅन्टी पाकिस्तानी ठरवून जेलमध्ये टाकलं होतं, तुम्हाला जाब विचारणारे विद्यार्थी, सामाजीक कार्यकर्ते सर्वच पाकिस्ताणी आहेत तर मग भारतीय कोण? भाजपचे आयटी सेल वाले आहेत का? असा सवाल उपस्थित करत दिपके यांनी सरकारवर हल्लाबोल केला. जाब हवचारणारांना जेलमध्ये टाकलं जातयं, आम्ही सर्व जेलमध्ये जायला तयार आहोत पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या असी मागणी करत दीपके यांनी सरकारला शुक्रवार (दि.19) पर्यंत राजीनाम्यासाठी अल्टमेट दिला आहे.
लवकरच मी देशभरात काही मुख्य शहरांत फिरणार आहे गरज पडेल तिथे जाउन अवाहन करणार आहे त्यामुळे सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आंदोलनास संबोधित करताना अभिजीत दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या जाहीरनाम्याचे वाचन केले ज्यामध्ये पाच प्रमुख मुद्दे आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीचा जाहीरनामा
1)पेपर लीक झाल्यावर विद्यसार्थ्यांना नुकसान भरपाई म्हणून दर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये सरकारने द्यावेत. जर परीक्षेचा निकाल उशिरा लागला तर निकाल लागेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 प्रति महिना द्यावे.
2) 72 तासांच्या आत बॅकचा पर्याय उपलब्ध असला पाहिजे.
3) हाताने लिहिलेले पेपर हातानेच चेक करावेत, पेपर ऑनलाईन चेक करू नयेत.
4) परीक्षेच्या सहा दिवस आधी कम्प्यूटर ऑडिट झालं पाहिजे
5) एनसीईआरटी ने जो नकाशा काढलाय पुस्तकात तो वापस घेतला पाहिजे.
‘इंन्कलाब जिंदाबाद, कॉक्रोच मांगे रेज्गिनेशन’ च्या घोषणा देत होते.अनेकांनी झुरळाचे चित्र असलेले मास्क घातले होते. विद्यसार्थ्यांच्या हातात संविधानाची प्रत होती. रोहित वेमुल्लासह पेपर फुटीच्या नैराश्येतून मृत पावलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजलीही यावेळी देण्यात आली. सोनम वांगचुक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. राष्ट्रगिताने आंदोलन स्थगित करण्यात आले.



Comments