कलाकेंद्रातील नृत्यांगनावर बीडमधील युवकाचा प्राणघातक हल्ला नंबर का ब्लॉक केला म्हणत कोयत्याने सपासप वार; जखमी नृत्यांगनावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
- Navnath Yewale
- 12 hours ago
- 2 min read

जामखेड: कलाकेंद्रात काम करणार्या एका नृत्यांगनावर तीच्याच मित्राने कोयत्याने सपासाप वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि.6) जामखेड (आहिल्यानगर) घडली आहे. जखमी नृत्यांगनावर जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नृत्यांगनाच्या फिर्यादीवरुन बीडच्या तरुणा विरोधात जामखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड येथील एका कला केंद्रात काम करणार्या नृत्यांगनावर राहुल अशोक कचरे रा. खळेगाव (ता.गेवराई, जि. बीड) येथील कोयत्याने केलेल्या हल्ल्यात नृत्यांगना गंभीर जखमी झाली आहे. राहुल कचरे याचे कोयत्याचे वार तिने हातावर झेलल्याने तिचे दोन्ही हातावर गंभीर वार झाले आहेत. नृत्यांगनाच्या दोन्ही हाताच्या नसा तुटल्याने तिची प्रकृती गंंभीर असून, तिच्यावर शहरातील खासगी यग्णालयात उपचार सुरू आहेत.
जामखेड शहरातील तपनेश्वर भागात एका सांस्कृतिक कला केंद्रातील26 वर्षीय नृत्यांगनेवर तिच्याच मित्राने कोयत्याने वार करून तिला जीवे मारण्याच प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील मुख्य संशयित आरोपी हा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आहे.
“ तु माझ्याशी फोनवर का बोलत नाही? माझा नंबर ब्लॉक का केला?” असा जाब विचारत त्याने तिच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात नृत्यांगना गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जामखेड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खळेगाव (ता. गेवराई, जि.बीड) येथील राहुल अशोक कचरे आणि नृत्यांगना यांच्यात मागील पाच वर्षापासून मैत्रीचे संबंध होते. मात्र , राहुल यांच्या त्रासाला कंटाळून महिलेने यापूर्वीही त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. गुरुवारी रात्री आरोपीने फोन करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर शुक्रवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास जेव्हा नृत्यांगना आपल्या खोलीवर असताना दबा धरुन बसलेल्या राहूलने तिच्या खोलीत प्रवेश केला.
राहुलने रागाच्या भरात तिच्यावर कोयत्याने हल्ला चढवला, राहुलने नृत्यांगणनाच्या हातावर, बोटावर आणि डोक्यावर कोयत्याने सपासप वार केले. दरम्यान, नृत्यांगनाने आरोपी राहुलचे वार हातावर झेलल्याने तिच्या दोन्ही हातावर, डोक्यावर आणि हाताच्या बोटांना कोयत्याच्या खोलवर जखमी झाल्या. यावेळी नृत्यांगनाच्या मैत्रिणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुलने तिलाही धमकावले आणि “ मी तुला संपवून टाकणार” असे म्हणत घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी नृत्यांगनेच्या फिर्यादीवरून राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई) याच्या विरोधात जामखेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरिक्षक दशरथ चौधरी, सहाय्यक निरिक्षक वर्षा जाधव या प्रकरणाचा तपास करत असून फरार आरोपी राहुल कचरे याचा शोध घेत आहेत.



Comments