कल्याणचा तो परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात
- Navnath Yewale
- Jul 23
- 1 min read
मनसे पदाधिकार्यांनी शोधून केला पोलिसांच्या हवाली; आरोपी झा गुंड प्रवृत्तीचा

कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा आता पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. रुग्णालयातील रिसेप्शनिस्टने गोकुळ झा नावाच्या तरुणाला थांबण्यास सांगितल्याने त्याने ही मारहाण केली होती. याघटनेनंतर गोकुळ झा फरार झाला होता. आता त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
नांदिवली परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात एका रिसेप्शनिस्टला गोकुळ झा नावाच्या तरुणानं बेदम मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही सारी घटना सीसीटीव्ही कॅमेर्यानं टिपली आहे. संबंधित डॉक्टरांकउे काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बसले होते. त्यामुळं रिसेप्शनिस्टनं गोकुळ झा यास थांबण्यास सांगितलं. पण तो तरुण जबरदस्तीने डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रिसेप्शनिस्टनं अडवलं असता त्या तरुणांन तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या माहरणीत तरुणीचे कपडे फाटले आणि तिला जबर दुखापत झाली. या प्रकरणात पिडीत तरुणीनं डोंबिवलीच्या मानपाड पोलिस स्थानकाम तक्रार दाखल केली. पण आरोपी गोकुळ झा फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्या भावाला, रणजीज झा याला अटक केली होती. आत झा देखील पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पिडीत तरुणीची तिच्या घरी जाऊन भेट घेतली. पिडीत तरुणीच्या रुग्णालयातल्या उपचारांची सारी जबाबदारी मनसेनं घेतल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणातील आरोपी गोकुळ झा याला आम्ही धडा शिकवणार असा इशाराही त्यांनी दिला होता.
आरोपी झा गुन्हेगारी पार्श्वभूमिचा
पोलिस रेकॉर्डवर याची गुन्हेगार म्हणून नोंद आहे. कल्याणच्या कोळसेवाडी आणि विठ्ठलवाडी पोलिस स्थानकात त्याच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान, आरोपी गोकुळ आणि त्याचा भाऊ रणजीत झा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रिसेप्शनिस्ट तरुणी ही मराठी आहे. तर झा हा गुंड परप्रांतिय आहे त्यामुळे हा वाद आता मराठी -अमराठी या मुद्याकडे जात असल्याचं चित्र आहे.



Comments