top of page

वाल्मिक कराडच्या घरातून काहितरी सूत्र हालतात; एसआयटीकडूनही शून्य तपास- ज्ञाणेश्वरी मुंडे सघर्ष करत राहणार, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

बीड: परळीतील व्यवसायिक महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास एसआयटीमार्फत तपास सुरू आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीने आतापर्यंत पाच जणांच्या नार्कोटेस्ट, ब्रेन मॅपिंग केल्या आहेत. नार्को टेस्टचा अहवाल जाहीर नसल्याने आज ज्ञाणेश्वरी मुंंडे यांनी एसआयटी प्रमुखांची भेट घेतली. त्यानंतर ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधून तीव्र नाराजी व्यक्त करत गंभीर आरोपासह संताप व्यक्त केला.


ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी आज एसआयटी प्रमुख आयपीएस पंकज कुमावत यांची भेट घेवून तपासावर तीन तास चर्चा केली. त्यानंतर ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ज्ञाणेश्वरी मुंडे म्हणाल्या की, परळी पोलिसांनी जे केलं तेच एसआयटीने शून्य तपास केला असं मला आज जानवलं. मला एलमाटे पोलिसांनी सांगितले होते की बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबवला. जगमित्र कार्यालयाचा त्यावेळेसचा सगळा कारभार वाल्मिक कराड सांभाळत होता. त्याच्याशिवाय परळीतलं पानही हालत नव्हतं, आणि मग त्यानेच तपास थांबवला आणि त्याच्याच मार्फत त्याच्या मुलांनी कट रचून खून केला आहे. मी सगळा पुरवणी जबाब दिला पण अद्याप अरोपींना टक करत नाहीत. का नाही केलं अटक? एसआयटीवर जो काही दबाव आहे, तो वाल्मिक कराडच्या घरातूनच आहे.


राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ फड यांच्या आरोपांवर ज्ञाणेश्वरी मुंडे म्हणाल्या की, अहवाल हातात नसताना राजाभाऊ फड साहेबांनी साहेब (धनंजय मुंडे) यांच नाव घ्यायला नको होतं, ते त्यांच चुकलच. अहवाल हाता नसताना बदनाम करणं चुकलच. मात्र त्याचवेळी जगमित्र कार्यालयातूनही प्रेस घेण्यात आली. त्यांच्या खिलाप केस होत गेली त्यांनी नितीन निर्मळ म्हणाले की, मच्छर मेला की पोलिस केस करावा का? ग्रामपंचायतीने पहावा मग महादेव मुंडे परळीत मच्छर टाईप होता का?, परळीत मारला गेला आणि त्याच्यासाठी कोणी आवाज नाही उठवला पाहिजे. राजाभाऊ फड साहेबांचं चुकलं की त्यांनी धनंजय मुंडे साहेबांचं नाव घ्यायला नको होतं. आम्हाला सुरुवातीपासून धनंजय मुंडे साहेबांवर डाऊट नव्हता, वाल्मिक कराडवरच डाउट होता.


पण राजाभाऊ फड साहेबांनीही या प्रकरणात आवाज उठवला आम्हाला काय माहित ते धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतील. पण धनंजय मुंडे साहेबांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे होती. एसआयटी प्रमुखांशी चर्चेबाबत ज्ञाणेश्वरी मुंडे म्हणाल्या की, एसआयटी प्रमुखांचं म्हणणं आहे की गोट्या गित्ते जो पर्यंत सापडत नाही तोपर्यंत या केस मध्ये काही होत नाही. मग गोट्या गित्ते काय पाताळात लपलाय का? यावरुन मला न्याय मिळण्याची अपेक्षा धुसर झाली आहे. मी पुन्हा संघर्ष करत राहिल मुख्यमंत्री साहेबांनी मला भेटीसाठी वेळ द्यावा, त्यांना मला काही सांगायचं आहे. दादा (मनोज जरांगे) यांच्या रुपाने पाठीमागे उभाराहणारा भाऊ मिळाला आहे. लवकरच त्यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री साहेबांची भेटीसाठी वेळ मागणार असल्याचेही ज्ञाणेश्वरी मुंडे म्हणाल्या.

Comments


bottom of page