संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू
- Navnath Yewale
- 4 hours ago
- 1 min read

बीड: बीडमध्ये गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे बीडचं बिहार झालंय का असं उगाच म्हटलं जात नाही. अशातच मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देखमुख प्रकरणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील साक्षीदाराला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. साक्ष दिली तर तुला आणि धनंजय देशमुख यांना ठार मारू, अशी धमकी दिल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर यांना या प्रकरणामध्ये साक्ष न देण्यासाठी आणि हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी त्याच्या सख्या लहान भावानेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच साडू दादा खिंडकर हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेत सक्रिय आहे.
दादा खिंडकर हा आपल्या घरी असताना, त्याला लहान भाऊ समाधान खिंडकर हा त्या ठिकाणी आला. त्याने जुन्या वादाची करापत काढत दादा खिंडकरला थेट बजावलं की, “ तू धनंजय देशमुख यांच्यासोबत राहू नकोस आणि संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नकोस. ते प्रकरण मिटवून घ्यायला सांग. त्यावर दादा खिंडकरने
, तुला याच्याशी काय करायचं आहे? जू तुझे काम कर, असं उत्तर दिलं. याचा राग मनात धरून लहान भाऊ समाधान खिंडकर याने दादा खिंडकरला शिवीगाळ केली.
या प्रकारानंतर दादा खिंडकर यांनी थेट पोलिस ठोण गाठून तक्रार दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने दखल घेत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तक्रारदार दादा खिंडकर आणि आरोपी समाधन खिंडकर या दोन्ही भावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक आणि इतर कारणांवरून वाद सुरू आहेत. या प्रकरणी आता शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.



Comments