महसूलमंत्री बावनकुळे यांच्यावर अश्लिल पोस्ट, त्रिशुल पाटील यांच्यावर जालनात गुन्हा
- Navnath Yewale
- 14 hours ago
- 1 min read

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्याकडून महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घणाघातील टीका सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या टीकेला प्रत्यूत्तर देताना एखादा मंत्री ओबीसी असेल तर त्याला लक्ष्य करणं योग्य नसल्याचं म्हटलं. त्यातच आता फेसबुक अयाडीवर महसूलमंत्री बावनकुळे यांच्यावर अश्लिल व्हिडिओ पोस्ट केल्या प्रकरणी जालन्यात त्रिशुल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जबाबदार धरत त्यांच्यावर घणाघातील टीका केली. पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यावर असलेले जरांगे पाटील यांच्याकडून अगदी कालपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्राचा दाखला देत बीडचे निवाशी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी मंत्री बावनकुळे यांना क्लिनचिट दिली.
यावर जरांगे पाटील यांनी शिवकुमार स्वामी यांच्यावर जोरदार पलटवार करत भाजपचे प्रवक्ते बनवू नका असा निर्वानिचा इशारा दिला. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी महसूलमंत्री बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवलेली असतानाच आता त्रिशुल पाटील यांच्यावर जालनाच्या सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
त्रिशुल पाटील या फेसबुक आयडीवरून महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विषयी अश्लिल शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल केला. याप्रकरणी मोहन आबोले यांच्या फिर्यादीवरून सदर बाझार पोलिस ठाण्यात त्रिशुल पाटील यांच्यावर अश्लिल शिवीगाळ आणि अश्लिल शिवीगाळ करणारे व्हिडिओ प्रसारीत करणं 296 बीएनएस आणि 67 आयटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Comments