बीड पुन्हा हादरलं!: कृष्णा आंधळे, जयराम चाटे यांच्या टोळीकडून डोळ्यात मिरची पावडर टाकून एकावर लोखंडी रॉडने हल्ला
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 1 min read

बीड: बीडमधील गुन्हेगारी घटनां थांबायचं नाव घेत नाहीत, मागील दोन वर्षापासून जिल्ह्यात गुंडगिरीने थैमान घातले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेचे प्रकरण संपूर्ण राज्यासह देशभरात गाजले होते. या प्रकरणी दोषींना अटक करण्यात आलेली आहे, मात्र कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. अशातच या प्रकरणातील एक आरोपी जयराम चाटे आज (दि. 13 मार्च) भावाच्या बाराव्याच्या विधीकरिता तुरुंगातून बाहेर आला होता. अशातच जयराम चाटे बाहेर येण्याची माहिती मिळताच बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात काल दुपारी पाच जणांनी संग्राम चाटे नामक तरुणाला अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकून कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला हत्येचा प्रयत्न केला. मारहाण करताना सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयाराम चाटे आणि कृष्णा आंधळेचे नाव घेत धमकावले, ‘ तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे -1313 तुला दाखवतो’ असे म्हणत हल्ला केला.
या हल्ल्यात तरुण संग्राम चाटे गंभीररित्या जखमी झाल असून केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणातील आरोपी जयराम चाटे आज एक दिपसासाठी जेलच्या बाहेर आला आहे. तांबवा येथे तो भावाच्या बाराव्याच्या विधीसाठी पोहोचला. तो बाहेर येण्यापूर्वीच त्याच्या टोळीतील सदस्यांकडून गाव परिसरात तरुणावर हल्ला करत दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, तब्बल 14 महिन्यानंतर जयराम चाटे हा काही तासांसाठी तुरुंगाच्या बाहेर आला होता. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्तात तो विधीसाठी हजर होता. यानंतर त्याला पुन्हा तुरूंगात नेण्यात आले. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मिक कराडसह अनेकांना अटक करण्यात आलेली आहे.



Comments