top of page

थट्टा जीवावर बेतली, किरकोळ वादातून मित्रानेच केला घात पुण्यात दोन मित्राच्या वादातून एकाचा खून; घटनेचे सीसीटिव्ही व्हायरल

पुणे: राज्याची सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी, खून, अवैध धंद्याचे प्रमाण वाढत आहे. दोन मित्रातील थट्टा एकाच्या जीवावर बेतल्याचा प्रकार समोर आला आहे. थट्टा, मस्करीचे रुपांतर हाणामारीत होवून मित्रानेच इतर साथीदारांच्या साह्याने मित्राचा खून केल्याचा धक्कायक प्रकाराचा सीसीटिव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासातून चार जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपासाची चक्रे फिरवली आहेत.


पुण्यातील कॅम्प परिसरात किरकोळ वादातून मारहाण आणि हत्येचा प्रकार घडल्याची माहिती आहे. मयत आणि आरेापी हे दोघेही मित्र असून दोघांमध्ये कॅम्प परिसरात किरकोळ वाद झाला. त्यानंतर दोघांमधील वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याने सहा जणांनी मयत तरुणावर वार करत त्याची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण 4 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सूरू आहे.


फैसल फारुख खान असं हत्या झालेल्या तरुणाचं नावं असून शाहबाज शेख याच्यासोबत त्याचा वाद झाला होता. किरकोळ वादानंतर दोघांमध्ये मारहाण झाली आणि शाहाबाजच्या इतर मित्रांनी एकत्र येत फैसलवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बजाद अली सय्यद, अली अब्बास अश्रफअली सय्यद, सोहेल युसुफ तांबोळी, शाहाबाज चांद शेख, तालिब अली सय्यद. अश्रफली सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शहबाज शेख याची मयत फैसल खान याने थट्टा मस्करी केली, त्याचा राजग आल्याने शाहबाज याने मयताच्या कानाखाली चापट मारली. यातूनच दोघांमध्ये वाद झाल्याने शहबाज शेख व त्याच्या बाकीच्या साथीदारांनी धारदार चाकुने फैसल खानच्या छातीत, पाठीत, हातावर आणि डोक्यात वार करत त्याची हत्या केली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून घटनेचा सीसीटिव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामध्ये भररस्त्यात आजुबाजूला माणसं असतानाही ही मारामारीची घटना घडत असल्याचे दिसून येत असून काहींनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केल्याचेही स्पष्ट दिसत आहे.

Comments


bottom of page