कल्याणमध्ये प्रचार रॅलीत स्फोट; लातूरच्या अहमदपूरच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा मृत्यू
- Navnath Yewale
- Jan 13
- 1 min read

कल्याण/ लातूर : राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत होते. राज्यातील सर्वच बडे नेते सभांमध्ये व्यस्त होते. अशातच आज कल्याणमध्ये निवडणुक प्रचाराच्या सांगतेदरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. कल्याणमधील योगिधाम परिसरात पॅनल 2 मधील महायुती उमेदवारांच्या प्रचार रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कल्याणमधील योगिधाम परिसरात महायुती उमेदवारांच्या प्रचार रॅली सुरू होती यावेळी रॅलीतील झेंडा टाटा कंपनीच्या विजेच्या वायरला लागल्याने जोरदार स्फोट झाला. या दुर्घटनेत क्षितिज पाटील हा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महायुतीचे उमेदवार दया गायकवाड, वनिता पाटील, गणेश कोट, अनघा देवळेकर यांच्या प्रचार रॅली दरम्यान ही घटना घडली आहे. त्यामुळे आता योगिधाम परिसरातील विजेच्या लोंबकळणार्या विद्युत वाहिन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लातूरमध्ये नवनिर्वाचित नगरसेविकेचे निधन : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे याचं आज पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. छातीत दुखत असल्याने त्यांना अहमदपूरच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्या तिथे त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. शाहूताई कांबळे यांनी नुकताच झालेल्या नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाकडून निवडुन आल्या होत्या.



Comments