काँग्रेसचा डिएनए भाजपमध्ये, मुळ भाजप आहे कुठे? - सुप्रीया सुळे
- Navnath Yewale
- Jul 19
- 2 min read

भाजपच्या मुळ नेत्यांशी आमचे कौटुंबीक संबंध होते त्यांच्या वकृत्त्वही तसेच तोलदार असायचे. ज्यांनी सत्ता नसताना सतरंज्या उचलल्या, संघर्ष केला भाजपचा झेंडा घेवून पुढे आले ते कार्यकर्ते आज कुठंयत. मुळचा भाजप राहिलाच नाही आताच्या भाजपमध्ये काँग्रेसचा डिएनए असल्याची टीका राष्ट्रवादी (श.प.) पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केली.
पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडासत्रामध्ये विधानभवन परसिरात दोन आमदारांच्या समर्थकांमधील राडा, सभागृहात सदस्यांच्या भाषेचा घसरलेला स्तर, राज्यातील समस्यांवर खासदार सुप्रीया सुळे यांनी पुण्यात पत्रकारपरिषदेद्वारे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंशी संवाद साधला.
खासदार सुळे म्हणाल्या की, भाजपमधील पूर्वीचे नेते फार संयमी आणि शांत असायचे, त्यांचं वकृत्व मनाला भावनारं असायचं. स्व. सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू आदींची भाषणं ऐकून माणुस फॅन व्हायचं. विचाराची लढाई विचाराणे लढली पाहिजे. आम्ही जरी विरोधी पक्षात असलो तरी आजही स्व. सुषमा स्वराज यांच्या कुटुंबीयांशी आमचे कौटुंबीक संबंध आहेत. आणि ते आम्ही जपतो जपलेही पाहिजेत. अगदीच भाजपच्या बहुतांश नेत्यांचे आमचे कौटुंबीक संबंध आहेत. विचार वेगळे असले पाहिजेत पण विचाराने टिकवता आले पाहिजेत, यालाच तर लोकशाही म्हणतात.
आम्ही विरोधी पक्षात असलो म्हणून काय झालं, राज्याच्या समस्या आम्हाला केंद्रात मांडाव्या लागतात. मागील चार वर्षापूर्वी सरकारचं कामकाज पाहिलं तर मुख्यमंत्री वर्षावर खासदारांची मिटींग बोलावून आम्हा सर्व खासदारांना राज्यातील प्रश्नांची पुस्तीका दिली जायची. पण हे सरकार आल्यापासून एकदाही खासदारांना बोलवलं नाही. मुख्यमंत्र्यांना मी स्वत: पत्र लिहिलंय की, खासदारांची मिटींग घ्या, पण का मुख्यमंत्री खासदारांची मिटींग घेत नाहीत.
शेजारच्या आंध्रप्रदेशात चंद्राबाबु नायडूंनी मिटींग घेतली आहे. बाकीची राज्य मार्गदर्शन करत आहेत मग महाराष्ट्र का करत नाही. श्रेयाचा विचार का करायचां. आम्ही राज्यातलेच आहोत खासदार काय बाहेरुन आलेलो नाहीत. केवळ टीकेसाठी विराधेक म्हणून नाही तर राज्याच्या हितासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे.
राज्यातील थीत हनीट्रॅपवर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, प्रत्येकांना खासगी आयुष्य असतं. पण पूर्वीच्या काळी वर्तमान पत्र आणि टिव्ही चॅनलवरील बातम्या पाहिल्या शिवाय जमतच नव्हतं, आता लेकरांना सांगावा लागतंय की बातम्या पाहू नकोस एवढा स्तर खालावलाय याला जाबादार राजकारणीच आहेत. हनी ट्रॅपची बातमीचा अर्थ आम्ही लेकरांना काय सांगयचा? मुख्यमंत्री का नाही सांगत की सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कावाई करण्यात येईल म्हणून. हे सगळ निट करण्याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच असल्याचेही खासदार सुळे यावेळी म्हणाल्या.
केंद्रीयमंत्री नितिन गडकरींची स्तुती:
भाजप मंत्र्यां विषयी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, नितिन गडकरी यांचा दरवाजा सर्वांसाठी कायम उघडा असतो. पक्ष वगैरे ते कधीच मानत नाहीत. त्यांच्याकडे काम घेवून जाणारा प्रत्येक जण समाधानी होवूनच परततो असल्याचे सांगत त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची स्तुती केली.



Comments